Friday, 30 October 2020

"असा रंगला सन्मान तिच्या प्रतिभेचा सोहळा "



आयुष्याची दुसरी इनींग सुरु करताना म्हणजेच "पाळी जाताना" ह्या विषयावर ,साहित्यसंपदा आयोजित "उत्सव तिच्या प्रतिभेचा " उपक्रमांतर्गत प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती तज्ञ डॉ. सोनाली मनीष वनगे ह्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेकडो महिलांना मार्गदर्श केले. पाळी  म्हणजे काय ?मासिक पाळी काळातील  समस्या आणि उपाय ? पाळी जाताना दिसणारी लक्षणे आणि पाळी थांबताना होणारा त्रास ह्या व इतर मुद्द्यांना त्यांनी हात घालून महिलांच्या अनेक शंकांचे निरसन केले.


"कोविड दरम्यान अन्न  व्यवसायात  घ्यावयाची काळजी " विषयावर अनुपमा पाटीलअसिसटंट कमिशनर फूड अँड ड्रग महाराष्ट्र ह्यांनी मार्गदर्शन करताना अन्न व्यवसायातील नवीन आव्हानांची ओळख करून दिली. तेजस्विनी नेने ,महिला व बाल कल्याण सभापती ह्यांनी "स्त्री आणि समाज सेवा " विषयावर मार्गदर्शन करताना महिलांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला देताना स्वतःच्या पायावर उभे रहाण्याकरता उपलब्ध असलेल्या विविध संधींची ओळख करून दिली. विविध विषयांवर पार पडलेल्या चर्चा सत्रांना उत्तम प्रतिसाद  मिळाला. "महिलांचे कायदेविषयक अधिकार " ह्या विषयावर ऍड. धनश्री पाटील ह्यांनी मार्गदर्शन केले तर "आत्मरक्षणाची  गरज " ह्या विषयावर स्नेहल शिंदे ह्यांनी मार्गदर्शन केले. साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांच्या संकल्पनेतून नुकताच


 "उत्सव तिच्या प्रतिभेचा " हा उपक्रम  नवरात्री दरम्यान पार पडला.महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातून ह्याला उत्तम प्रतिसाद लाभला. मार्गदर्शनपर सत्रां सोबतच वक्तृत्व  ,कथा अभिवाचन ,काव्य वाचन,साहित्यप्रश्न मंजुषा,पाककृती स्पर्धा,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे आणि सौंदर्य स्पर्धा ह्या स्पर्धां पार पाडून स्त्रियांच्या प्रतिभेला वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला.सदर उपक्रमाची सांगता जेष्ठ साहित्यिकआणि गझलकार  ए के शेख , जीव झाला येडा पिसा ,छोटी मालकीण,लक्ष्य ,दुर्वा अश्या प्रसिद्ध मालिकांचे दिगदर्शक पुष्कर रासम ह्यांच्या उपस्थितीत झाली.गायन ,एकपात्री ह्यांच्या सादरीकरणाने रंगलेल्या सोहळ्याचे प्रास्ताविक वैशाली झोपे ह्यांनी करताना सीमा पाटील ह्यांनी निवेदन केले. उपक्रमाची तांत्रिक बाजू मनोमय मीडिया ह्यांनी सांभाळली. अरण्यक सारख्या प्रसिद्ध नाटकाच्या रंगभूषाकार रीना महाडिक आणि राखी शिंदे ह्यांनी सोहळ्या दरम्यान निकाल जाहीर केले.स्मिता हर्डीकर , किसन पेडणेकर ,रसिका लोके,सोनाली शेडे  ह्यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.सेल्फ रुपेश म्हात्रे ,पल्लवी पतंगे ,अपेक्षा बिडकर ,आरुषी दाते,सुरेंद्र बालंखे,उत्तम चोरडे  ह्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. जवळपास दोनशे स्पर्धकांतून शेवटच्या फेरी पर्यंत रंगलेल्या अति तटीच्या स्पर्धेत मानसी नेवगी ह्यांनी "मी सौंदर्यवती " मुकुट पटकावला तर संगीता तातावार ,रेश्मा पवार आणि स्मित शिवदास ह्यांनी अनुक्रमे द्वितीय ,तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. महिलांच्या मनात आत्मविश्वास रुजवण्या सोबत सकारात्मता रुजवण्याचे काम साहित्यसंपदा समूहाने केले आहे.


समूह प्रवक्ते मंजुळ चौधरी ह्यांनी आगामी उपक्रमांची माहिती देताना मराठी बोली भाषा संवार्धासाठी  येत्या दिवाळीत साहित्यसंपदातर्फे "बोली भाषा महोत्सव " दिनांक १३. ११. २० ते १६. ११. २० साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली .ह्या आगामी उपक्रमा अंतर्गत कोकणी ,मराठवाडी ,मालवणी ,झाडीबोली,नागपुरी,अहिराणी,तावडी,आगरी ,चंदगडी,वऱ्हाडी ,देहवाली,कोल्हापुरी,बेळगावी,वाडवळी ,तंजावर मराठी ,नंदभाषा,पोवारी आणि इतर बोली भाषां मधील साहित्याचा आस्वाद कथा,कविता ,चारोळी ,हायकू ,लेख ,निबंध आणि चर्चा सत्र इत्यादींच्या माध्यमातून घेता येणार आहे. सदर कार्यक्रम साहित्यसंपदा फेसबुक समूहात लाईव्ह होणार असल्याने दिवाळीत घर बसल्या आपल्या बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपल्याला हातभार लावता येणार आहे.


सदर उपक्रमासाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधून आपण कोणत्या बोली भाषेच्या अंतर्गत कोणता साहित्यप्रकार सादर करणार आहात ह्याची पूर्व नोंदणी करणे अपेक्षित आहे. बोली भाषा संशोधकांना ह्या उपक्रमाअंतर्गत जाहीर निमंत्रण दिले गेले असून आपण बोली सुद्धा भाषा संवर्धनासाठी मार्गदर्शन करावे असे निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


  येणाऱ्या पुढील पिढीस बोली भाषेची गोडवे टिकाऊ म्हणून १४ नोव्हेंबर २० ह्या  बालदिनी   बालकांसाठी बोली भाषेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.येणाऱ्या पिढ्यां  मध्ये बोली भाषेची मुळे खोलवर रुजवित म्हणून काही निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात येणार आहेत.


अश्या प्रकारे बोली भाषा संवर्धनसाठी एक पाऊल साहित्यसंपदा टाकत असताना ,महाराष्ट्रातील विविध स्तरातील आणि भागांतील साहित्यिकांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९३००८०३७५ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment