Tuesday, 31 May 2022

२२ जुलैला भेटीला येणार 'अनन्या'

 


२२ जुलैला भेटीला येणार 'अनन्या' 


प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टिझरही झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे.


‘अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल, हे मी खात्रीने सांगतो. अनन्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.’’


एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मिती 'अनन्या' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रताप फड यांनी सांभाळली आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची जबाबदारी निभावली आहे.

‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘अर्जुन’ अव्वल ‘अर्जुन स्टोरी’ने द्वितीय तर ‘अवंती’ने पटकावला तृतीय क्रमांक

 



‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘अर्जुन’ अव्वल

‘अर्जुन स्टोरी’ने द्वितीय तर ‘अवंती’ने पटकावला तृतीय क्रमांक



‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी दर्जेदार आणि नावान्यपूर्ण आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नामवंतांसोबत उगवत्या कलाकारांनाही व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘प्लॅनेट मराठी’ तर्फे ‘प्लॅनेट मराठी शॉर्ट फिल्म फेस्टिवल’चे (पीएमएसएफएफ)आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल अखेर जाहीर झाला. पाच लाखांचे प्रथम पारितोषिक मधुबन फिल्म्सच्या ‘अर्जुन’ या शॅार्टफिल्मला मिळाले असून तीन लाखांचे द्वितीय पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अर्जुन्स स्टोरी’ला मिळाले आहे. तर दोन लाखांचे तृतीय पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अवंती’ या शॅार्टफिल्मने पटकावले आहे. पन्नास हजाराचे उत्तेजनार्थ पारितोषिक राखाडी स्टुडिओच्या ‘अभी - अनू’ आणि तीस हजाराचे पारितोषिक अमर गोरे व अकबर सय्यद यांच्या ‘आत्मन’ या  शॅार्टफिल्म्सना देण्यात आले आहे. 


 या शॅार्टफिल्म फेस्टिव्हलला तुफान प्रतिसाद मिळाला असून अवघ्या महाराष्ट्रातून सुमारे १६०० प्रवेशिका आल्या होत्या. या वेळी परिक्षक म्हणून  संजय जाधव, मृणाल कुलकर्णी, किरण यज्ञोपावित, निखील महाजन, सर्वेश परब यांनी जबाबदारी सांभाळली होती. आजवर आयोजिलेल्या मराठी शॅार्ट फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये एवढ्या मोठ्या बक्षीसाची रक्कम कदाचित पहिल्यांदाच देण्यात येत आहे. 


‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “या स्पर्धेत सुमारे दीड हजारांहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आम्ही पहिल्यांदाच आयोजिलेल्या या शॉर्टफिल्म फेस्टिवलमधील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग आमच्यासाठी खूपच लक्षणीय होता. इतक्या स्पर्धकांमधून केवळ तीन स्पर्धक निवडणे, हे आमच्या परिक्षकांसाठीही खूपच आव्हानात्मक होते. प्रत्येक शॅार्ट फिल्मचा विषय वेगळा होता, मांडणी वेगळी होती, त्यातील प्रत्येक कलाकाराचा दर्जेदार अभिनय होता. त्यामुळे निवड करणे खूप कठीण होते. कोणत्याही आशयावर अन्याय होऊ नये, याची पुरेपुर काळजी आमच्या परिक्षकांनी घेतली आहे आणि त्यातून या पाच शॅार्ट फिल्म्स विजेत्या ठरल्या आहेत.’’

'वाय' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला....



https://youtu.be/wclVgmo-LgE

 'वाय' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला....


कल्पनेपलिकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या 'वाय' चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला



मुक्ता बर्वेने हातात मशाल धरलेले 'वाय' या  चित्रपटाचे आगळेवेगळे असे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे विविध अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता 'वाय' चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' २४ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? अर्थात या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर कळणार आहेतच. 


चित्रपटाच्या उत्कंठापूर्ण प्रमोशनची आणि 'वाय' या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असतांना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ''वाय' या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. वाय ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. ह्या टीझरचा आणि 'वाय' या नावाचा अर्थ तुम्हां सर्वांना जाणून घ्यायचा आहेच आणि त्यासाठी 'वाय' नक्की म्हणजे नक्की पहा." 


कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

Monday, 30 May 2022

South Indian Bank wins 3 prestigious awards in a row





 South Indian Bank wins 3 prestigious awards in a row 


Thrissur: The Kerala-headquartered South Indian Bank recently bagged three prestigious awards in Mumbai. 


Finnoviti Awards 2022 from Banking Frontiers

Business leader of the year award, 2022 from CMO Asia

Most admirable BFSI professional Award from World BFSI Congress to Mr. Anto George T. (SGM - HR and Admin, South Indian Bank) 



Finnoviti Award that recognizes in-house Technology Innovation Quotient, honored South Indian Bank amongst 134 other innovators across BFSI sector, yet again, for the second time in a row.  The award appreciates the learnings of organisations’ past experiences and the strategic steps taken to reinvent and innovate their products, processes, technologies, experiences and people to this new culture of the gig economy and empower their people to work from anywhere efficiently. The award not just focuses on identifying innovations, but also weighs their considerable contributions made to customers, society and the industry. 


The “Business leader of the year award, 2022” celebrated South Indian Bank’s initiatives on employee engagement and enhancement. The bank received the prestigious recognition in the category of ‘Workplace and People Development’ by CMO Asia. 


South Indian Bank’s SGM - HR and Admin, Mr. Anto George T.’s distinct presence in the BFSI sector was instrumental in the World BFSI Congress bestowing him with the ‘Most admirable BFSI professional Award’. 


Commenting on the awards, Mr. Murali Ramakrishnan, MD & CEO of South Indian Bank said, “As an organization, we have always believed that our employees are one of the important stakeholders for our bank. It is an honor to be recognized at such reputed platforms. It encourages us to continually focus on employee well-being as a means to build the brand’s integrity and strength. This is definitely a noteworthy testament to our expertise and will inspire us to continue to invest in such strategic frameworks. Winning in such platforms justly acknowledges our constant efforts to be the true next-generation bank.”

Friday, 27 May 2022

१५ जुलैला झळकणार ‘तमाशा लाईव्ह’

 


१५ जुलैला झळकणार ‘तमाशा लाईव्ह’


अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’चे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर झळकले होते. टिझरने  चित्रपटाविषयीची उत्सुकता इतकी वाढवली की, प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहू लागले. मात्र आता ‘तमाशा लाईव्ह’साठी प्रेक्षकांना जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण येत्या १५ जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


 प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ टिझरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आम्ही हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तमाशा लाईव्ह’म्हणजे प्रेक्षकांसाठी सांगितिक मेजवानी आहे. आपली लोककला जपत त्याला आधुनिकतेचा साज देण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.’’


प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘तमाशा लाईव्ह’ची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केला असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. तर या चित्रपटाला अरविंद जगताप यांचे संवाद लाभले असून कथा विस्तार किरण यज्ञोपवित यांनी केला आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील गाण्यांना क्षितीज पटवर्धन यांनी बोल दिले आहेत. ‘तमाशा लाईव्ह’मघ्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Thursday, 26 May 2022

गोदरेज व्हेज ऑइलने निवड केली महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील आघाडीच्या वडा पाव आउटलेट्सची;'वडा पाव चा राजा' म्हणून निवडला गेला अंधेरीचा साई कृपा वडा पाव



 गोदरेज व्हेज ऑइलने निवड केली महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील आघाडीच्या वडा पाव आउटलेट्सची;'वडा पाव चा राजा' म्हणून निवडला गेला अंधेरीचा साई कृपा वडा पाव


 ठाणे २६ मे २०२२: वडापाव हा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो आणि तो राज्यभरातील लोकांसाठीचा लाडका आणि आरामदायी खाद्यपदार्थ आहे. गोदरेज व्हेज ऑइल या लोकप्रिय खाद्यतेल ब्रँडने लोकांच्या पसंतीक्रमावर आधारित महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील आघाडीच्या सर्वोत्तम वडा पाव आउटलेट्सची ओळख करून देण्यासाठी एक अनोखा पथदर्शी उपक्रम सादर केला आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी महाराष्ट्र टुरिझमने गोदरेज व्हेज ऑइलसोबत भागीदारी केली आहे.


प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित एका समारंभात वडापाव आऊटलेट मालकांना औपचारिकरित्या सन्मानित करण्यात आले. दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेफ वरुण इनामदार; खाद्य लेखक आणि अभिनेते कुणाल विजयकर; महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयातील पर्यटन विशेषज्ञ प्रीती वानगे पवार आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितीन नाबर हेही यावेळी उपस्थित होते. 


'वडा पाव चा राजा' हा उपक्रम मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि सातारा येथे पार पडला. या शहरांमधील जवळपास २५० इच्छुक आउटलेट्सवर मतदानासाठी क्यूआर कोड ठेवण्यात आले होते. चव आणि समाधानाच्या आधारावर ग्राहकांनी प्रत्येक आउटलेटवर मतदान केले. या मोहिमेला जनतेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.


मुंबईस्थित वडा पाव आऊटलेट अंधेरी येथील साई कृपा वडा पाव यांना त्यांच्या ग्राहकांकडून मिळालेल्या मतांच्या आधारे 'वडा पाव चा राजा' म्हणून घोषित करण्यात आले. उपविजेता ठरला ठाण्याचा अक्काचा वडा पाव. अग्रस्थानी असलेल्या या दोन विजेत्यांव्यतिरिक्त सात शहरांमधील २० आउटलेट्सना संबंधित शहरांमध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळविल्याबद्दल विशेष सम्मानाने गौरविण्यात आले. 


गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष नितीन नाबर म्हणाले, "मी सर्व विजेत्यांचे ग्राहकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाबद्दल अभिनंदन करू इच्छितो. गोदरेज व्हेज ऑइल हे चव, शुद्धता, गुणवत्ता आणि खाद्यतेलांच्या विविधांगी श्रेणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाते. वडा पाव आस्थापनांना शुद्ध, भेसळविरहित आणि दर्जेदार ब्रँडेड तेल वापरण्यास प्रोत्साहित करणे हे या मोहिमेचे व्यापक उद्दिष्ट आहे जेणेकरून लोकांना केवळ उत्तम चवच नाही तर उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थही मिळतील.”


लोकप्रिय चित्रपट अभिनेते भाऊ कदम म्हणाले, "गोदरेज व्हेज ऑइलचे प्रतिनिधित्व करणे खूप आनंददायी आहे आणि राज्यभरातील वडा पाव मालकांना भेटून खूप मजा आली. सूर्यफूल तेल, राइस ब्रॅन ऑइल, फिल्टर केलेले शेंगदाणा तेल, रिफाइंड शेंगदाणा तेल आणि रिफाइंड सोयाबीन तेल यांसारख्या गोदरेज व्हेज ऑइल सादर करत असलेल्या खाद्यतेलांची विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी पाहून मला आश्चर्य वाटले. सर्वसामान्य माणसाइतकेच सेलिब्रिटींचेही वडा पाव वर तेवढेच प्रेम असते. त्यांनाही तो तितकाच आवडतो. वडापावबद्दल आपल्या राज्याला वाटत असलेल्या प्रेमाविषयी बोलण्याबरोबरच हा उपक्रम सर्व वडा पाव आउटलेट मालकांना त्यांनी महाराष्ट्रातील लोकांसाठी स्वयंपाक करताना दररोज उच्च दर्जाचे शाकाहारी तेल वापरावे याची आठवण करून देणारा होता.” 


याप्रसंगी बोलताना पर्यटन संचालनालय (महाराष्ट्र)चे संचालक मिलिंद बोरीकर म्हणाले, "गोदरेज व्हेज ऑइलने आयोजित केलेल्या 'वडा पाव चा राजा' उपक्रमाशी जोडून घेतल्याचा महाराष्ट्र टुरिझमला आनंद होत आहे. वडा पाव हा महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी, तोंडाला पाणी सुटणारा एक पदार्थ आहे. महाराष्ट्रातील असंख्य फूड आऊटलेट्सवर उपलब्ध असलेल्या वडापावचा आस्वाद घेतल्याशिवाय महाराष्ट्रातील पर्यटन अनुभव अपूर्ण आहे. हा 'वडा पाव चा राजा' उपक्रम अधिकाधिक वडा पाव उत्पादकांना पुढे येण्यास आणि राज्यातील पाककृतीचा एक अंगभूत भाग बनलेल्या या स्वादिष्ट खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याचा आनंद साजरा करायला प्रोत्साहित करेल."


या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोदरेज व्हेज ऑइल विविध समुदायांना विशेषकरून 'वडा पाव चा राजा' साई कृपा वडा पावने बनवलेले एकूण ५००१ वडापाव वितरित करेल. हे वडा पाव मुंबईतील डबेवाला समाज यांना आणि रॉबिन हूड आर्मी या शून्य-निधी संस्थेला गरजूंमध्ये वाटण्यासाठी देण्यात येतील.


यावर भाष्य करताना मुंबई डबावालाचे प्रवक्ते रितेश आंद्रे म्हणाले, "आम्ही डबेवाले नेहमीच लोकांना वेळेवर जेवण मिळावे याची दक्षता घेत असतो. पण डबेवाल्यांची काळजी घेणारा आणि आम्ही भुकेले राहत नाही ना याची दक्षता घेत असलेला उपक्रम बघणे ही खूप छान गोष्ट आहे. 'वडा पाव चा राजा' चा मुकुट मिळविण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही या उपक्रमाचे कौतुक करतो. हा उपक्रम केवळ आपल्या प्रादेशिक  खाद्यपदार्थाचे कौतुक करतो असे नाही तर समुदायाशी थेट संपर्क देखील प्रस्थापित करतो."

The coolest dance cover of Saregama's Whistle Baja 2.0

 The coolest dance cover of Saregama's Whistle Baja 2.0 is here to entertain you with some super dance moves feat. Gunjan Sinha, Sanchit Chanana, Amit Kumar and Florina spearheaded by Chintan Pavlankar & Rajeev Goswami from WebRangers Talent Management


Link- https://www.youtube.com/watch?v=3WCfXQzNpOg

Sung by Mika Singh and Neeti Mohan, the battle began with the iconic whistle tune. One by one each dancer burned the stage with their move, each better than the previous one.

Chintan Pavlankar Co-founder of WebRangers Talent Management says "Dance battles are not so popular in India, however thanks to dance reality shows, battles are now slowly gaining momentum. More and more people are now taking up dance as a serious career and these young stars are wonderfully paving the way for their generation"

Danish Khan Co-founder of WebRangers Talent Management says "A dance battle is a one-on-one combat between two individuals or crews, where dancers have to analyse the music being played by the DJ, catch the beats, impress the judges and entertain the crowd. It’s all about multitasking and these dancer are outstanding"

Wednesday, 25 May 2022

Capillary partners with Wazir Advisors to promote its full-stack ecommerce solution

 Capillary partners with Wazir Advisors to promote its full-stack ecommerce solution


25th May, 2022- Capillary Technologies Limited (a B2B SaaS company providing full-stack E-commerce solutions) today announced its partnership with Wazir Advisors, CPG and Retail consultancy firm, to accelerate growth for its full-stack e-commerce solution.

A dramatic rise in online sales since the beginning of the COVID-19 pandemic has undoubtedly pushed retailers to completely fortify their digital strategies. To fulfill this need, Capillary’s full-stack e-commerce model assists brands to build and execute a long-term online strategy as well as achieve substantial growth online. The B2B SaaS Company thus offers guidance in the development

and implementation of the online strategy, investment commitments, and brand’s marketing and operation teams.

Powered by Capillary’s Anywhere Commerce platform, Capillary’s full-stack model has helped its customers generate significant digital growth, and Wazir Advisors will help the company expand this offering to more brands that are looking for a holistic e-commerce solution. Said Arun Naikar (VP of Anywhere Commerce, Capillary Technologies), “The customer’s demand for digital channels is on the rise, and by incorporating a 360-degree approach, we want to help businesses not only with the varied capabilities of Anywhere Commerce+ but also with managing the platform optimally, driving both traffic and revenue. We have reaped major success with apparel brands like Indian Terrain, which has achieved a 30X online sales growth in 12 months. Together, with Wazir Advisors, we can truly empower brands to navigate the infinite world of digital channels.”

Since 2009, Wazir Advisors has been guiding brands from various industries like CPG, Fashion & Apparel, FMCG and Packaged Food to capture sustainably profitable business opportunities. Their consulting expertise also includes guiding companies into new ventures, markets and product segments as well as streamlining business strategies. As elaborated by Harminder Sahni, Founder, Wazir Advisors, “With Capillary’s partnership, Wazir can now enable its clients to rely on Capillary’s end-to-end digital ecosystem for their ecommerce needs.”

According to Pakhi Saxena, Head CPG Retail “Wazir Advisors vast experience of working with legacy as well as digital native brands will lend to evolving the ecosystem with focus on optimization levers in addition to growth.”

Tuesday, 24 May 2022

 Amidst weak markets, eMudhra IPO sees successful closure on final day of bidding

 

Mumbai, May 24, 2022: The Initial Public Offering (IPO) of Bengaluru-based eMudhra Limited ("Company"), the largest licensed Certifying Authority (“Certifying Authority” or “CA”) in India with a market share of 37.9% in the digital signature certificates market space in FY 2021, received bids of 3,09,02,516 shares against the offered 1,13,64,784 equity shares, at a price band of ₹243-256, according to the data available on the stock exchanges. Overall the issue was subscribed 2.72 times on the last day of bidding.

 

The Qualified Institutional Investors and Retail investors was subscribed 4.05 and 2.61 times respectively. Non Institutional Investors portion was subscribed 1.28 times. The issue opened for subscription on Friday, May 20 and closed on May 24, 2022.

 

The IPO consists of a fresh issue of equity shares aggregating to Rs 161 crore and an offer for sale (OFS) of up to 9,835,394 equity shares. The proceeds from its fresh issuance worth Rs 35 crore will be utilised for the repayment or prepayment of borrowings, in full or part of all or certain borrowings; Rs 40.22 crore for funding working capital requirements; Rs 46.36 crore for purchase of equipment’s and funding of other related costs for data centres; Rs 15.03 crore for funding of expenditure related to product development; Rs 15.27 crore for investment in the company for development, sales, marketing for future growth and general corporate purposes.

 

IIFL Securities Limited, Yes Securities (India) Limited, and Indorient Financial Services Limited are the Book Running Lead Managers and Link Intime India Private Limited is the registrar to the Issue.

Investors queue up for Aether Industries IPO; Good demand seen across QIB, HNI and Retail segment on Day 1

 Investors queue up for Aether Industries IPO; Good demand seen across QIB, HNI and Retail segment on Day 1

Mumbai, May 24, 2022: The Initial Public Offering (IPO) of Surat-based Aether Industries Limited ("Company"), a speciality chemical manufacturer in India focused on producing advanced intermediates and speciality chemicals involving complex and differentiated chemistry and technology core competencies, received bids of 30,41,635 shares against the offered 93,56,193 equity shares, at a price band of ₹610-642, according to the data available on the stock exchanges. Overall the issue was subscribed 0.33 times on the first day of bidding.

Employee portion was subscribed the most with 0.54 times followed by Retail Investors with 0.54 times. Qualified institutional buyer portion was subscribed 0.36 times. The reserved portion of non-institutional investors witnessed a subscription of 0.05 times. The issue kicked off for subscription on Tuesday, May 24 and will be open till Thursday, May 26.

In a pre IPO placement of 2,024,921 equity shares, aggregating to Rs 130 crore were allotted to IIFL Special Opportunities Fund- Series 9 and 10, SBI Fund Management Limited, India Acorn Fund Limited and Ashoka India Equity Investment Trust Plc and The Regents of the University of California – IIFL Asset Management Limited.

On Monday, Aether Industries Limited raised Rs 240.26 crore from 13 anchor investors i.e SBI Mutual Fund, Ashoka India Opportunities Fund (White Oak), The Nomura Trust, Goldman Sachs FundsAxis Mutual Fund, Aditya Birla Mutual Fund, Kotak Mutual Fund, IDFC Mutual Fund, Tata Mutual Fund, Max Life Insurance, IIFL UCAL, Allianz Global Investor, Amundi mutual funds, who were allotted 37,42, 495 equity shares at the upper price band of Rs 642 per share.

Brokerage houses like Ventura Securities and Choice Broking have given recommended “Subscribe” rating to the issue.

As per analysts, Aether’s operational capabilities are supported by the fact that they are among the few Indian specialty chemical companies to have successfully launched these 3 separate business models in just 5 years into commercial manufacturing. During this period, the company has built a diversified portfolio of advanced intermediates and speciality chemicals involving complex and differentiated chemistry. The company is also a domestic and international market leader in all of its major products.

HDFC Bank Limited and Kotak Mahindra Capital Company Limited are the book running lead manager to the issue and Link Intime India Private Limited is the registrar to the offer.

Venus Pipes & Tubes shares lists on bourses; closes at a premium to its issue price



 Venus Pipes & Tubes shares lists on bourses; closes at a premium to its issue price 


Mumbai, May 24, 2022: Gujarat-based Venus Pipes & Tubes Limited, one of the leading Stainless Steel Pipes and Tubes Manufacturer, listed on the NSE at Rs 337.50 at 3.53% premium over its issue price. The scrip got listed at BSE at Rs 335 per share, 2.76% per cent premium over its issue price of Rs 326. The company's share price closed at Rs 351.75 per share on the BSE, a 7.90% premium, and at Rs 354.35 per share on the NSE, an 8.70% premium.

As per NSE, the total quantity traded stood at 12.14 lakh shares, on BSE the total Quantity stood at 0.41 lakh shares. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs 43.18 crore.

The Market Capitalization of the Company post today’s closing price stood at Rs. 713.92 Crore as per BSE and Rs. 719.19 Crore as per NSE.

The initial share sale with a face value of Rs 10 per equity share, is entirely a fresh issue of 50,74,100 equity shares, with no offer for sale component and the issue was closed on 13th May 2022. The non-institutional investors portion was subscribed 15.66 times, while the part set aside for Qualified institutional buyers was subscribed 12.02 times. Retail investors had put in bid 19.04 times the shares reserved for them. Overall the issue was subscribed 16.31 times.

SMC Capitals Limited is the sole book running lead managers and Kfin Technologies Limited is the registrar to the offer. The equity shares of the company are proposed to be listed on BSE and NSE.  


सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या 'रानबाजार'चे पुढील भाग लवकरच २७ मे रोजी झळकणार प्लॅनेट मराठी ओटीटीवर

 


सर्वाधिक व्ह्यूज असलेल्या 'रानबाजार'चे पुढील भाग लवकरच 

२७ मे रोजी झळकणार प्लॅनेट मराठी ओटीटीवर  


असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?’ अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘रानबाजार’ या भव्य वेबसीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून सर्वच स्थरातून त्याच्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षकांनी ‘रानबाजार’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. वेबसीरिजच्या पहिल्या टीझरपासूनच खरंतर 'रानबाजार' वादळ निर्माण करणार याची खात्री होती आणि तसेच झाले. अवघ्या दोन दिवसांत या वेबसीरिजच्या ट्रेलरला २ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज आले असून  इतक्या अल्पावधीत एवढी लोकप्रियता प्राप्त करणारी ही पहिली मराठी वेबसीरिज आहे. नुकतेच ‘रानबाजार’चे ३ भाग 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या तिन्ही भागांनी अक्षरशः खळबळ माजवली आहे. यातील तिसरा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे, जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती पुढील भागांची. मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता 'रानबाजार'चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच २७ मे रोजी झळकणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असणाऱ्या या वेबसीरिजची भव्यता यापूर्वी क्वचितच वेबविश्वात अनुभवण्यास आली असेल. 


प्राजक्ता माळी आपल्या भूमिकेबद्दल सांगते, “यापूर्वी अशा प्रकारची भूमिका मी कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी 'बबली' इमेज बदलली. रत्ना साकारणे नक्कीच सोप्पे नव्हते. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझे वजन वाढवले. रत्ना ही एक वेश्या आहे. त्यामुळे तिची देहबोली, चालणे- बोलणे, तिचे राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याचा मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवार पेठेत आणि मुंबईतील कामाठीपुरात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांचे निरीक्षण केले. शारीरिक बदलासोबतच मला माझी मानसिकताही बदलावी लागली आणि त्यातूनच ही रत्ना समोर आली. अनेकांनी माझ्या या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. काहींनी नाराजीही व्यक्त केली. परंतु या नाराजीकडे मी सकारात्मकतेने बघतेय. हे 'रत्ना'चे कौतुक आहे.'' 


तेजस्विनी पंडित ‘रानबाजार’धील आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलते, “आजवर मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. अगदी सरळसाधी मुलगी ते अतिशय बोल्ड मुलगी. बबली इमेज ते अगदी बायोपिक सिनेमेही केले. परंतु अशा प्रकारची बोल्ड व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारत आहे. अनेक प्रतिक्रिया आल्या, येत आहेत. ज्या अपेक्षित होत्या. त्यामुळे त्यांचा मी मनापासून स्वीकार करत आहे आणि हीच माझ्या कामाची पावती आहे. ज्यावेळी या भूमिकेबद्दल मला विचारणा करण्यात आली त्याक्षणी मी ही ऑफर स्वीकारली. अभिजित पानसे सारखे दिग्दर्शक, दमदार कथानक, 'प्लॅनेट मराठी' सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि तगडी स्टारकास्ट अशा सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. प्रत्येक क्षणी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या 'रानबाजर'मध्ये हळूहळू खूप गोष्टी उलगडणार आहेत. 


तर ‘रानबाजार’चे लेखक, दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, “ रानबाजारला मिळणारा प्रतिसाद पाहता, खूप आनंद होतोय. प्रेक्षक असा बोल्ड विषयही स्वीकारत आहेत. त्यांची मानसिकता बदलत आहे. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नवनवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याची आम्हाला संधी मिळते. ही माझी पहिलीच वेबसीरिज आहे. चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये खूप फरक असतो. चित्रपटाच्या कथेतील सस्पेन्स हा शेवटी समोर येतो. फारफार तर मध्यंतरापूर्वी. मात्र वेबसीरिजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर आणून संपवावा लागतो, जिथे पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. वेबसीरिमध्ये कोणत्याही मर्यादा नसल्याने विचारविनीमयाने आशय बनवावा, या मताचा मी आहे. त्यामुळे प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि मी, आमच्या दोघांच्या विचारसरणीतून ही भव्य आणि कधीही वेबविश्वात न पाहिलेली वेबससीरिज साकारण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. प्रत्येक पात्राने आपली भूमिका उत्तम वठवली आहे.'' 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ अभिजित पानसे दिग्दर्शित 'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये अगदी प्राथमिक प्रक्रियेपासून माझा सहभाग होता. त्यामुळे यातील प्रत्येक व्यक्तीने घेतलेली मेहनत मी पाहिली आहे. हा आशयच इतका दमदार आहे, की आजवर वेबविश्वात सहसा असा विषय कोणीच हाताळला नसेल. प्लॅनेट मराठी ओटीटी हे एक असे माध्यम आहे. जे केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित नसून ते परदेशातील प्रेक्षकांसाठीही आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवरील कॉन्टेन्ट पाहात आहेत. त्यांना ग्रामीण पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर कॉन्टेन्ट देण्याची जबाबदारी ही आमची आहे. 'रानबाजार' ही अशीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेबसीरिज आहे. येत्या शुक्रवारी येणारे पुढील भागही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत.'' 



पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असणाऱ्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॉडक्शन, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली आहे. यात तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, उर्मिला कोठारे,  वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Friday, 20 May 2022

जिओ स्टुडिओजच्या ‘मी वसंतराव’चे चित्रपटगृहात अर्धशतक


 जिओ स्टुडिओजच्या ‘मी वसंतराव’चे चित्रपटगृहात अर्धशतक


जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी पन्नास दिवस पूर्ण केले आहेत. चित्रपटाने समिक्षकांकडून, प्रेक्षकांकडून आणि अनेक मान्यवरांकडून वाहवा मिळवली. सध्या अनेक बॅालिवूड, दाक्षिणात्य, मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र या स्पर्धेत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाने पन्नासाव्या दिवशीही आपली जागा कायम ठेवत बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला कमावला आहे. 

एका ध्येयवेड्या कलाकाराची जीवनकथा यात दाखवण्यात आली असून प्रत्येकालाच आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक उर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहून पद्मविभूषण शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनीही पुढील वीस वर्षे काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे सांगितले. राहुल देशपांडेंमध्ये त्यांना वसंतरावांचा भास झाला. हा केवळ चित्रपट नसून यातून बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले तर आपली संस्कृती किती श्रीमंत आहे, हे या चित्रपटातून कळते, अशी प्रतिक्रिया अभिनेता मकरंद देशपांडे यांनी दिली. हा एक सर्वोत्कृष्ट चित्रपट असून राहुलने वसंतराव अगदी हुबेहुब साकारल्याचे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. याव्यतिरिक्त शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, केदार शिंदे, सचिन खेडेकर, आदित्य सरपोतदार, रवी जाधव, रेणुका शहाणे, अश्विनी भावे, अंकुश चौधरी, स्वप्नील बांदोडकर, वैदेही परशुरामी, गितांजली कुलकर्णी आदी नामवंतांनीही सकारात्मक प्रतिक्रया दिल्या आहेत.


अभिनेता राहुल देशपांडे म्हणतात, “ गुढीपाडव्याच्या शूभमुहुर्तावर ‘मी वसंतराव’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत प्रेक्षकांनी या चित्रपटाला जे प्रेम दिले, त्यामुळेच हा टप्पा आम्ही गाठू शकलो. प्रेक्षकांच्या आजही चित्रपट पाहून प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे हुरूप वाढतो. चित्रपटाची संपूर्ण टीम आणि माझे कुटूंब, नातेवाईक यांच्यामुळेच मी वसंतरावांची भूमिका योग्यरित्या साकारू शकलो. त्यामुळे हे सगळं यशाचं श्रेय आम्हा सर्वांचं आहे.’’


निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' हा काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून जिओ स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

'भिरकीट'ची संगीतमय मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला





 'भिरकीट'ची संगीतमय मेजवानी प्रेक्षकांच्या भेटीला



अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' हा चित्रपट १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. धमाल विनोदी आणि कौटुंबिक नाते यांच्या सोबतच या चित्रपटात अपल्याला जबरदस्त संगीत ऐकायला मिळणार आहे. 'भिरकीट' च्या टिझर आणि पोस्टरने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या चित्रपटातील गाणी रसिकांच्या भेटीला आली असून हा सांगितिक सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


‘लाईन दे मला’ हे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्यात मोनालिसा बागल आणि तानाजी गालगुंडे यांची प्रेमकहाणी सोबतच रोमँटिक डान्सही पाहायला मिळत आहे. या गाण्याला मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले असून या गाण्याचे बोल नकास अजीज ,आनंदी जोशी यांचे आहेत.  मनाला भिडणारे ‘आसवांची’ आणि ‘गॉगल’ ही ठसकेदार लावणीही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील सर्व गाणी मंगेश कांगणे यांनी लिहिली असून ‘गॉगल’ हे गाणे उर्मिला धनगर, मंगेश कांगणे यांनी गायले आहे. तर ‘आसवांची’ हे भावनिक गाणे शैल हाडा यांनी गायले आहे. 


‘भिरकीट’चे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात," हा एक धमाल विनोदी चित्रपट तर आहेच, शिवाय या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी आहेत. ‘लाईन दे मला’ या गाण्यात तानाजी गालगुंडे प्रथमच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्व गाणी चित्रपटाच्या कथेला अनुसरून शब्दबद्ध करण्यात आली आहेत." 


या वेळी अनुप जगदाळे यांनी ‘लाईन दे मला’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, ‘’हे संपूर्ण गाणे तानाजी आणि मोनालिसा यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात आम्ही रोमान्ससोबतच धमालही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन तानाजीला अनुसरून केले आहे. त्याने अतिशय उत्तमरित्या हे नृत्य सादर केले आहे, हे गाणे पाहताना त्याचा अनुभव येईलच. तानाजीनेही या नृत्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. 

 क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनुप जगदाळे तर पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत ,छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहे. शैल-प्रितेश या हिंदी जोडीचे धमाल संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.

Wednesday, 18 May 2022

ओटीटी वरील देशातला सगळ्यात सशक्त कथानक असलेल्या ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित २० मे पासून फक्त प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला

 


ओटीटी वरील देशातला सगळ्यात सशक्त कथानक असलेल्या ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित 

२० मे पासून फक्त प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला



काही दिवसांपूर्वी अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या बिग बजेट वेबसीरिजचे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. या बोल्ड टिझरची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर आता ‘रानबाजार’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरनेही सर्वत्र खळबळ माजवली आहे. 



‘रानबाजार’च्या टिझरमधून तेजस्विनी पंडीत आणि  प्राजक्ता माळीचा थक्क करणारा मादक अंदाज प्रेक्षकांनी नुकताच अनुभवला आहे. ट्रेलरमधून यातील इतर चेहरेही आता समोर आले आहेत. यात उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता  खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पॅलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजीत पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली असून ही भव्य वेबसीरिज २० मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


   आजवर कधीही न पाहिलेले राजकारण, त्यातील धूर्त डावपेच, हनी ट्रॅप, उत्कंठा, नाट्यमय थरार हे सगळंच ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यामुळे ‘रानबाजार’ची उत्सुकता आता अधिकच शिगेला पोहोचली आहे. आजवरच्या वेबविश्वात कदाचित कधीही न पाहिलेली कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. 





‘रानबाजार’चे दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, “टिझरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी टिझरने लाखो व्ह्युजचा टप्पा पार केला असून ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता वेबसीरिज प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ही वेबसीरिज पाहताना प्रेक्षकांच्या मनात असं काहीसं घडलं होतं,  कदाचित, असा विचार आल्याशिवाय राहणार नाही. राजकारणाभोवती फिरणारी ही कथा असली त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, ज्या कल्पनेपलीकडच्या आहेत. हेच गूढ ‘रानबाजार’मध्ये उलगडणार आहे. 


प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापुरकर म्हणतात, “ अभिजित पानसे यांचा चित्रपट म्हणजे काहीतरी हटके असणार, हा एक नियमच आहे आणि आता तर त्यांनी वेबविश्वात पदार्पण केले आहे. त्यांच्या पहिल्याच ‘रानबाजार’ या वेबसीरिजने वेबविश्व हादरून टाकले आहे. असा विषय आजवरच्या वेबविश्वात कोणीही हाताळला नसेल. या वेबसीरिजची भव्यता आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. प्लॅनेट मराठीने आपला प्रेक्षक केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता, अवघ्या जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचेही प्लॅनेट मराठीचे ध्येय आहे. त्यामुळेच प्रेक्षकांना तितक्या उच्च दर्जाचा आशय देण्यास आम्ही बांधिल आहोत. ‘रानबाजार’ ही त्याच दर्जाची वेबसीरिज आहे. राजकारणाभोवती फिरणाऱ्या या ‘रानबाजारा’तील गुपिते यानिमित्ताने समोर येणार आहेत.’’

LIC stock settles at Rs 875.45 on BSE and Rs 875.25 on NSE on debut OR LIC lists on the Indian bourses, closes at Rs 875.45 on listing day OR India’s biggest IPO LIC lists, closes at Rs 875.45 on BSE and Rs 875.25 on NSE on debut

                      

                       


                       LIC stock settles at Rs 875.45 on BSE and Rs 875.25 on NSE on debut

OR

LIC lists on the Indian bourses, closes at Rs 875.45 on listing day

OR

India’s biggest IPO LIC lists, closes at Rs 875.45 on BSE and Rs 875.25 on NSE on debut

 




Mumbai, May 17, 2022: Life Insurance Corporation of India (LIC) ("Company"), India's largest life insurer with a market share of 64.1 percent in terms of premiums, listed on the NSE at Rs 872 at 8.11% discount over its issue price. The scrip got listed at BSE at Rs 867.20 per share, 8.62% per cent discount over its issue price of Rs 949. The shares of the company at day end closed at Rs 875.45 per share on BSE and at Rs 875.25 per share on NSE. The initial public offering was offered at a lower price band of Rs 902 per share and higher price band of Rs 949 per equity share.

As per BSE, the total quantity traded stood at 27.55 lakh shares with a delivery quantity percentage of 47.05%. Total Quantity traded at NSE stood at 487.92 lakh shares with a delivery quantity percentage of 39.18%. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs 4591.10 crore.

The Market Capitalization of the Company post today’s closing price stood at Rs. 5.53 trillion as per BSE and Rs. 5.52 trillion as per NSE.

The initial share sale with a face value of Rs 10 per equity share, is a comprehensive offer-for-sale (OFS) of up to 221374920 equity shares by the President of India through the Ministry of Finance, Government of India ("Selling shareholders") and the issue was closed on 9th May 2022. The portion reserved for eligible policy holders was subscribed 6.12 times, reservation for eligible employees was subscribed 4.40 times, Retail Category was subscribed 1.99 times; the non-institutional category witnessed subscription of 2.91 times and qualified institutional buyers category saw subscription of 2.83 times. Overall the issue was subscribed 2.95 times.

Kotak Mahindra Capital Company Limited, Axis Capital Limited, BofA Securities India Limited, Citigroup Global Markets India Private Limited, JM Financial Limited, J.P. Morgan India Private Limited, Goldman Sachs (India) Securities Private Limited, ICICI Securities Limited, Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited and SBI Capital Markets Limited are the book running lead managers to the issue. 

Monday, 16 May 2022

eMudhra Limited’s Initial Public Offering to open on May 20, 2022, sets price band at ₹ 243 to ₹ 256 per Equity Share




 eMudhra Limited’s Initial Public Offering to open on May 20, 2022, sets price band at ₹ 243 to ₹ 256 per Equity Share

 

Mumbai, May 16, 2022: Digital Security firm eMudhra Limited (“The Company”) has fixed the price band at 243 to 256 per Equity Share for its maiden public offer. The initial public offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on May 20, 2022, for subscription and close on May 24, 2022. Investors can bid for a minimum of 58 Equity Shares and in multiples of 58 Equity Shares thereafter.

 

The IPO consists of a fresh issue of equity shares aggregating to 161 crore and an offer for sale (OFS) of up to 9,835,394 equity shares.

अनेक वेबसिरीजना मागे टाकणारी 'रानबाजार' लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येणार प्रेक्षकांच्या भेटीला... !



 अनेक वेबसिरीजना  मागे टाकणारी 'रानबाजार' लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर येणार प्रेक्षकांच्या भेटीला... !

टिझरला एका दिवसात १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद... !!


वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे. या दोन्ही टिझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टिझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टिझरला  १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. 


अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

*न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड... *



 *न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF) मध्ये जितेंद्र जोशी यांची सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड... *


जिओ स्टुडिओजच्या बहुप्रतीक्षित अशा 'गोदावरी' चित्रपटाने जगभरातील अनेक नामांकित राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपलं नाव कामवाल्यानंतर चित्रपटाचे अभिनेता जितेंद्र जोशी यांची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF)  २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता 'गोदावरी'च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. 


ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित, निखिल महाजन दिग्दर्शित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


'गोदावरी'बाबत दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, '' 'गोदावरी' या चित्रपटाला जगभरातून अनेक पुरस्कारांनी  गौरवण्यात आले आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी झाल्यानंतर आता नामांकित अशा कान्स चित्रपट महोत्सवात स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या पहिल्या पाच चित्रपटांमध्ये 'गोदावरी'चा समावेश करण्यात आला आहे. माझा अगदी जिवलग मित्र आणि या चित्रपटाचा अभिनेता जितेंद्र जोशी याला देखील न्यूयॉर्क  इंडियन  फिल्म फेस्टिवल (NYIFF)  २०२२ च्या सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्याबदल मला फार आनंद होत आहे.आयुष्य आणि मृत्य यांच्यातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न 'गोदावरी'मध्ये करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ सतरा दिवसांमध्ये चित्रित करण्यात आला आहे."


यापूर्वी या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 'इफ्फी २०२१' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शनातील विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांनी पटकावला आहे. तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ मध्ये 'गोदावरी' या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. वॅनक्योवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये २०२१ मध्ये वर्ल्ड प्रीमिअर आणि न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एशिया पॅसिफिक प्रीमिअरही दाखवण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तर शमीम कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Sunday, 15 May 2022

'वाय' नक्की आहे तरी काय ? अभिनेत्री मुक्ता बर्वेसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर !

 


'वाय' नक्की आहे तरी काय ?

अभिनेत्री मुक्ता बर्वेसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर !



   अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मिडीयावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वे हिने आपल्या सोशल मीडियावर 'वाय' चे पोस्टर धरलेला एक फोटो शेअर केला. त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, प्राजक्ता माळी इत्यादी अनेक कलाकारांनीही 'वाय' चे पोस्टर हातात धरून त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर केला आहे! या सर्वच कलाकारांनी  " माझा पाठिंबा आहे !  आपला ... ? " अशी विचारणा चाहत्यांना केल्यामुळे , चाहत्यांमध्येही 'वाय' या नावाबद्दल आणि चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे. हे सर्व कलाकार ' वाय ' या चित्रपटांमध्ये आहेत का की यातील काही मोजकेच कलाकार ' वाय ' या चित्रपटामध्ये आहेत की आणखी यापेक्षा वेगळेच कलाकार चित्रपटामध्ये आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शिवाय या पोस्टरमागचा अर्थ आणि नेमका उद्देश काय, याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता 'वाय' विषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 



 अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, '' 'वाय' चा अर्थ काय हे चित्रपटातून कळेलच. 'वाय' हे केवळ एक अक्षर नसून त्यामागे स्त्रीचा माणूस म्हणून जगण्याचा लढा आहे."




 'वाय' चे दिग्दर्शक अजित वाडीकर म्हणतात, ''' 'वाय' या अक्षरामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. हाच संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही 'वाय' मधून करत आहोत आणि यात आम्हाला मराठी सिनेसृष्टीची साथ मिळतेय, ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.'' 


कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील 'ती' च्या लढ्याची गोष्ठ सांगणारा 'वाय' २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार'



अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित प्लॅनेट मराठीच्या नवीन वेबसिरीजची घोषणा!


'रेगे', 'ठाकरे' असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. 'रानबाजार' असे नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसिरीजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. 


या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, " आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॅान्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षय ला वाटला. आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी 'रानबाजार' पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.'' 


प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे. आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला 'रानबाजार'विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसिरीजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसिरीज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल. 


प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज २० मे पासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Thursday, 12 May 2022

Tips Telugu & Bekkem Venugopal presents a new romantic song "Guppedantha"



Tips Telugu & Bekkem Venugopal presents a new romantic song "Guppedantha"

Link-  https://www.youtube.com/watch?v=YDcc8mY1oUo

Music by- Gantadi Krishna, Singer- Javed Ali, Lyrics- Ramajogaiah Sastry

Love story of collage romance, a boy trying to impress a girl, those were the days. Guppedantha shows a beautiful love story which will take you back to you collage days.

Gantadi Krishna says “Guppedantha is a result of countless hours of churning music, exploring different rhythms, taals”

Javed Ali says “A beautiful track, happy to be a part of it”

 Ramajogaiah Sastry says “Guppedantha will help you explore this enchanting world of thoughts and emotions"

हास्याचे फवारे उडवणाऱ्या 'भिरकीट'चा टिझर प्रदर्शित


 हास्याचे फवारे उडवणाऱ्या 'भिरकीट'चा टिझर प्रदर्शित

https://www.youtube.com/watch?v=jKL9w3OYf38



प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवायला येत्या १७ जूनपासून ‘भिरकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश  ओसवाल निर्मित 'भिरकीट'चे काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  अनुप जगदाळे दिग्दर्शित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालीसा बागुल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांचा हास्यकल्लोळ पाहायला मिळणार आहे. 



पैसा कमावण्याचे, प्रसिद्धीचे, सुखी राहाण्याचे ‘भिरकीट’ सगळ्यांच्या मागे असताना ‘तात्या’ मात्र वेगळ्याच दुनियेत जगत आहे. त्याच्या या दुनियेत नेमके काय होते आणि त्यातून तो बाहेर येतो का, हे ‘भिरकीट’ पाहिल्यावरच कळेल. हा एक धमाल विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असल्याचे कळतेय. 

‘भिरकीट’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, " मुळात ‘भिरकीट’ म्हणजे काय?  चित्रपटाचे नावच प्रशचिन्ह उपस्थित करणारे आहे. ‘भिरकीट’ हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अदृश्यरिता मागे लागलेले असतेच.  मुळात ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. टिझरवरून कळले असेलच माणूस ‘माणूस’ म्हणून किती उरलेला आहे. त्याच्यात किती बदल झाला आहे. हे सर्व ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहेत. अर्थात ती कथेची गरज होती. मात्र यात सगळे कसलेले कलाकार आहेत. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गिरीश कुलकर्णी  यात तात्याच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी आपण वळू, विहीर, गाभ्रीचा पाऊस, जाऊद्याना बाळासाहेब, फास्टर फेणे अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिलेला आहे. बॅालिवूडच्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘भिरकीट’मध्ये आता ते पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.’’

'भिरकीट'ची पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट आहे.  शैल व प्रितेश या हिंदी जोडीचे ‘भिरकीट’ला संगीत लाभले आहे.