Friday, 14 July 2023

आपल्या पालकांना ‘निश्चिंततेचा’ आनंद द्या

आपल्या पालकांना ‘निश्चिंततेचा’ आनंद द्या

 

नवीनच सुरू झालेल्या ट्रेंडनुसार आजकाल बहुतांश लोक आपल्या पालकांना टेलिफोनवर शुभेच्छा देतात किंवा त्यांच्या नातवंडांपैकी एकाने काढलेले शुभेच्छा कार्ड पाठवून कर्तव्यपूर्ती करतात. एका शहरात किंवा इमारतीत राहण्यासारखे कुणी भाग्यवान असल्यास, या विशिष्ट दिवसाला आपल्या पालकांसोबत बाहेर जेवायला जातात. हा दिवस सरला की पुन्हा ‘जैसे थे’. पण आपल्या पालकांच्या आशीर्वादांची परतफेड करण्यासाठी, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तुमच्या स्वर्णिम भविष्यासाठी खर्च केले, त्यांचे ऋण प्रकट करण्यासाठी याहून अधिक काही करायला हवे असे नाही वाटत?

 पालक आपल्या मुलांकडून कधीच काही मागत नाही, म्हणून त्यांना काही द्यायचेच नाही असे नाही ना. प्रेम आणि आदर यासारख्या अमूर्त भावनांचा संदर्भ इथे दिला जाऊ शकत नाही परंतु आता आमची आम्हीच त्यांचेसाठी काही करण्यास उत्स्फूर्ततेने पुढे यायला हवे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि त्यांना हवा असलेला आधार बनण्याची आता खरी गरज आहे. ‘वाढत्या महागाईच्या काळांत त्यांची पेन्शन पुरेशी आहे किंवा नाही’ याबाबत तुम्ही तुमच्या पालकांना कधी विचारणा केली होती? त्यांनी त्यांच्या सोनेरी दिवसांत जी स्वप्ने बघितली असतील, त्यांची पूर्तता होते आहे की अजूनही त्यांचा संघर्ष सुरु आहे याबाबद कधी चौकशी केली आहे काय?

तुमच्या पालकांनी तुम्हाला दिलेल्या सुखाची परतफेड करण्याची नव्हे, त्याहून अधिक काही करण्याची वेळ आली आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे ध्येय ठेवायला हवे. त्यांच्या सुखी भविष्यासाठी ‘जीवन विमा पॉलिसी’ याहून अधिक योग्य भेटवस्तू असूच शकत नाही. तुमच्या मते ‘इंडियाफर्स्ट लाइफ’ हा एक सर्वश्रेष्ठ पर्याय असायला हवा आणि ‘इंडियाफर्स्ट लाइफ’ चा डेप्युटी सीईओ म्हणून, ही माझ्याकडून ही मोलाची सूचना असणार आहे. तथापि, एकदा का तुम्ही हा अनुभव घेतलात की तुम्ही माझ्याशी निश्चितच सहमत व्हाल याची खात्री मला आहे.

 महागाई वाढतीच असणार आहे

हे नीट समजून घ्यायला हवे. जगण्यासाठी आवश्यक खर्च दिवसेंदिवस वाढतच असणार आहे. यात, आरोग्यावर होणारा खर्च जोडल्यास, तुमची गंगाजळी दिवसेंदिवस कोरडी होताना दिसेल. आर्थिक निश्चिंतता असली की मनःशांती मिळते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. निवृत्तीच्या काळात तुमच्या पालकांना दैनंदिन खर्चाची काळजी असायला नको याची जाणीव तुम्हाला आहेच. परंतु आज तुमच्याकडे सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचे जे पर्याय उपलब्ध आहेत, ते त्यांना त्यांच्या काळात नसल्याने त्यांच्या स्वप्न पूर्तीत कुठेतरी अडचण भासते हे स्पष्ट दिसत असल्याने, याबाबतीत तुमची पिढी नक्कीच नशीबवान आहे हे तुम्हीही कबूल करायला हवे.

 सेवानिवृत्ती गंभीरपणे घ्यायला हवी

 योग्यरित्या निवडलेल्या सेवानिवृत्ती योजना तुमच्या पालकांच्या दुसऱ्या इनिंगसाठी आर्थिक संरक्षण योजनेची हमी देतात. या योजना, सुरुवातीच्या वर्षांसाठी खात्रीशीर परतावा मिळविण्याचा पर्याय देतात, सोबत बोनस म्हणून तुमच्या सेवानिवृत्ती निधीआणखी भर घालण्याची संधी देते. इन्शुरन्स-इन्व्हेस्टमेंट- एंडोमेंट- पेन्शन प्लॅन तुम्हाला विस्तारित कालावधीत सातत्याने अल्पप्रमाणात का होईना, बचत करण्यास सक्षम करते, जेणेकरून तुमच्या पालकांना त्यांच्या निवृत्तीकाळात एक निश्चित उत्पन्न मिळते. एकरकमी पेमेंट करण्याऐवजी विमा हप्त्याला अल्प अवधीच्या हप्त्यांमध्ये वाटले गेल्यास आर्थिक भार कमी होतो आणि अधिक परवडणारी पॉलिसी तयार केली जाऊ शकते.

तरुणपणीच बचत करण्यास सुरुवात करा

वर नमूद केलेले दोन्ही पर्याय, कुठल्याही वयात विकत घेतले जाऊन बचतीस सुरुवात केली जाऊ शकते परंतु याची सुरुवात जितक्या लवकर होईल, तितके बरे. कमी वयात कमी प्रिमियमचा लाभ मिळतो. यात उशीर केल्यास किंवा याकडे दुर्लक्ष केल्यास प्रिमियम वाढून हाताबाहेर जाऊ शकतो हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

 कर वाचवणे म्हणजे तुमची बचत

जीवन विम्याच्या पॉलिसीवर भरलेला प्रीमियम, कलम 80C अंतर्गत करमुक्त असून यावर कमाल सूट रु. दीड लाख आहे. तुमच्या पालकांच्या सेवानिवृत्ती योजनेचा भाग म्हणून किंवा तुमची स्वत:ची अतिरिक्त बचत व्हावी यासाठी तुम्ही पॉलिसी घेत असाल तर तुम्ही बचत केलेल्या रकमेची आणखी एका विमा पॉलिसीमध्ये पुनर्गुंतवणूक केली जाऊ शकते.

 तुम्ही लहान होता तेव्हा तुमच्या भविष्यासाठी तयार होण्याच्या मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावरयेणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याचे मार्गदर्शन पालक करतात. तथापि,  कुणीही सहजासहजी वृद्धत्व स्वीकार करत नाही. त्यामुळे,  त्यांच्या सरत्या वयात त्यांची काळजी घेणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे हे तुमचे कर्तव्यतर आहेच, सोबत पालक म्हणून हे मिळवून घेणे हा त्यांचा हक्कही आहे. भक्कम आर्थिक पाया तयार करून तुम्ही तुमच्या पालकांचा उर्वरित काळ अधिक सुरक्षित आणि सुखकर बनवू शकता. तुमचं वय किंवा तुमच्या पालकांचं वय हे महत्वाचे नसून विमा योजनेत लवकरात लवकर गुंतवणूक करणे अधिक महत्वाचे आहे.

 तुमच्या पालकांना उतरत्या वयात गरज असलेली एक ‘निश्चिंत भविष्य’ ही भेट एक सर्वश्रेष्ठ भेट असणार आहे.

  

द्वारे –

ऋषभ गांधी

डेप्युटी सीईओ

इंडिया फर्स्ट जीवन विमा कंपनी मर्यादित 

No comments:

Post a Comment