Wednesday 13 September 2023

खुले भूखंड दत्तक धोरण; प्रशासन करणार नागरिकांशी चर्चा

 


खुले भूखंड दत्तक धोरण; प्रशासन करणार नागरिकांशी चर्चा


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी खुले भूखंड दत्तक धोरण (ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी) चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणांतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खासगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. या बैठकीच्या माध्यमातून ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसीबाबत खुली चर्चा व्हावी, नागरिकांनी आपली मते मांडावीत आणि जनहिताचा निर्णय व्हावा एवढाच सरकारचा उद्देश आहे. आमचे सरकार हे लोकसांठी, लोकांमध्ये जाऊन काम करणारे सरकार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या तक्रारी आणि मते मांडायला व्यासपीठ मिळेल याची आम्ही सदैव काळजी घेऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.


बृहन्मुंबई महापालिकेतर्फे खुले भूखंड दत्तक धोरणांतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खासगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी तसेच धोरणात्मक चर्चेसाठी नागरिक, प्रशासन आणि सरकार यांना एकत्र आणून एकमताने जनहिताचा योग्य निर्णय घेता यावा, या उद्देशाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यातर्फे शुक्रवारी १५ सप्टेंबरला सायं. ४ वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment