एकताच्या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत पल्लवी माने, प्रियदर्शनी पारकर सर्वोत्कृष्ट
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गेली ३५ वर्ष मुंबईच्या सांस्कृतिक, कला, साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या एकता कल्चरल अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या गणपत गुणाजी जाधव
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक अमेरिकेतील डेनवर येथे राहणाऱ्या कवयित्री पल्लवी शिंदे-माने तसेच सिंधुदुर्ग येथील प्रियदर्शनी पारकर यांना विभागून सर्वोत्कृष्ट पारितोषिक, तर द्वितीय पारितोषिक गोवा येथील कवयित्री योगिता शेटकर, तृतीय क्रमांक कवयित्री कविता झुंजारराव यांनी प्राप्त केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी काम पाहिले असल्याची माहिती एकता कल्चरचे अध्यक्ष प्रकाश जाधव आणि तसेच उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी दिली.
सदर स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:-
प्रथम क्रमांक (विभागून)- पल्लवी माने शिंदे (अपडेट) - डेनवर, प्रियदर्शनी पारकर- (ते तुला), द्वितीय क्रमांक - योगीता शेटकर (जाती) गोवा- तृतीय क्रमांक- कविता झुंजारराव - दहिसर- (रोजच), उत्तेजनार्थ पारितोषिक- सुजाता घाडीगावकर - करी रोड (उध्वस्थ होता नाही), प्रतिभा पवार -कोथरूड पुणे (अशी मी एक), सुधाकर कांबळी - कल्याण (या काळजात माझ्या), मीनल कांबळे - ठाणे (चाळीचं स्वागत), महेंद्र घोडिंदे - न्यू पनवेल (नादखुळा), देवशाली पुरी - कांदिवली (बळी राजा)
स्पर्धेत महाराष्ट्रातल्या २०० कवीनी सहभाग घेतला होता. डिसेंबरमध्ये साहित्य संघ, गिरगाव मुंबई येथे होणाऱ्या ३५ व्या एकता सांस्कृतिक महोत्सवात विजेत्या कवींना गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी एका पत्राद्वारे दिली.
No comments:
Post a Comment