रोहित-रिंकूच्या झंझावातानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सुपर ओव्हरनंतर भारताचा रोमहर्षक ऐतिहासिक विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसर्या टी-२० सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने अफगाणिस्तानचा ३-० पराभव केला आहे. पहिला आणि दुसरा टी-२० सामना प्रत्येकी सहा विकेट्सने जिंकल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० मध्ये अफगाणिस्तानचा डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. रोहित शर्माच्या नाबाद १२१ धावा आणि रिंकू सिंगच्या नाबाद ६९ धावांच्या बळावर भारताने निर्धारित २० षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून २१२ धावा करू शकला. सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत १६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतालाही १६ धावा करता आल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने ११ धावा केल्या आणि त्यानंतर अफगाणिस्तानला फक्त एक धाव करू दिली. अफगाणिस्तान संघाने तीन चेंडूत दोन विकेट गमावल्या आणि त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोई गोलंदाजीसाठी आला आणि अफगाणिस्तान संघ त्याच्या फिरकीत अडकला. त्याने अवघ्या तीन चेंडूत मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांचे दोन बळी घेतले. सुपर ओव्हरमध्ये, एक संघ दोन विकेट गमावतो तेव्हा डाव संपतो असा नियम आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१२ धावा केल्या. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहित आणि रिंकूचं तुफान घोंघावलं. तत्पूर्वी भारताने २२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल (४) धावा करून बाद झाला तर शिवम दुबे (१) धाव काढून बाद झाला. तर विराट कोहली आणि संजू सॅमसन खातेही उघडू शकले नाहीत. यानंतर रोहित आणि रिंकू यांनी पाचव्या विकेटसाठी ९५ चेंडूत १९० धावांची नाबाद भागीदारी केली.
टीम इंडिया २०० धावांपर्यंत पोहोचू शकेल असे कोणालाही वाटले नव्हते, पण हिटमॅन आणि रिंकूने ते करून दाखवले. रोहितने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील विक्रमी पाचवे शतक झळकावले. तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. तो ६९ चेंडूंत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२१ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, रिंकूने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. ३९ चेंडूत ६९ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्याने २ चौकार आणि ६ षटकार मारले.
१२१ धावा ही रोहितची या टी-२० प्रकारामधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या. रोहितने ५ वर्षे आणि दोन महिने किंवा ६२ महिने किंवा १८९९ दिवसांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने तीन बळी घेतले. त्याचवेळी अजमतुल्ला उमरझाईला एक विकेट मिळाली.

शेवटच्या ५ षटकात भारताने एकही विकेट न गमावता १०३ धावा केल्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी करीम जनत आला आणि या षटकात रोहित आणि रिंकूने ३६ धावा केल्या. रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्याला नो बॉल देण्यात आला. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. यानंतर रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.
२१३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तान संघाला कर्णधार इब्राहिम झद्रान आणि रहमानुल्ला गुरबाज यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी ९३ धावा जोडल्या. ही भागीदारी कुलदीप यादवने मोडली. त्याने गुरबाजला झेलबाद केले. त्याने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. तर झद्रान ४१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा करून बाद झाला. अजमतुल्ला उमरझाई खाते उघडू शकला नाही. मोहम्मद नबीने १६ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३४ धावांची तुफानी खेळी करत सामना अफगाणिस्तानच्या दिशेने वळवला. मात्र, १७व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने नबीला तंबूमध्ये पाठवले. करीम जनत दोन धावा करून धावबाद झाला आणि नजीबुल्ला झद्रान पाच धावा करून बाद झाला. या विकेट्समुळे सामना पुन्हा रोमांचक झाला.
अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. गुलबदिन नईब खेळपट्टीवर होता. त्याने शराफुद्दीन अश्रफसह २० व्या षटकात १८ धावा दिल्या आणि सामना बरोबरीत सुटला. गुलबदीनने २३ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने तीन बळी घेतले. त्याचवेळी आवेश खान आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
अफगाणिस्तानचा पराभव झाला असला तरीही त्यांनी भारतीय संघाला विजयासाठी झुंजवले ही बाब नाकारता येणार नाही. भारतीय गोलंदाजांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. रोहितला सामनावीर तर शुभम दुबेला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका २५ जानेवारी पासून सुरू होणार आहे.
No comments:
Post a Comment