"आकांक्षा करंडक" खुली पथनाट्य स्पर्धा जाहीर
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा उपक्रम
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या विद्यमाने काव्यशैली क्रिएशन्स आणि सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित "आकांक्षा करंडक" खुली पथनाट्य स्पर्धा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'विकसित भारत@२०४७' ह्या उपक्रमा अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे.
सदर स्पर्धेची प्राथमिक फेरी १० आणि ११ फेब्रुवारी २०२४ तसेच अंतिम फेरी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी भाईंदर येथे आयोजित केली जाणार आहे. सहभाग नोंदणीसाठी अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२४ आहे. पथनाट्य सादरीकरणासाठी १० ते १५ मिनिटांची वेळ दिली जाणार आहे. एका पथनाट्यात ७ ते १० कलाकार सहभाग घेऊ शकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधून सादरीकरण करता येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क केवळ ₹ २००/- असणार आहे. जे आपण ऑनलाइन पद्घतीने जमा करू शकता.
सदर स्पर्धेसाठी बेटी बचाव- बेटी पढाओ, साक्षरता ते सक्षमता... महिला विकासाची यशोगाथा, स्वच्छ भारत - समृद्ध भारत, आयुष्यमान भारत, जे-ए-एम क्रांती (जनधन-आधार-मोबाईल), आत्मनिर्भर भारत, बीज से बाजार तक किसान के साथ हर कदम आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण : खरे परिवर्तन असे महिला, आरोग्य, आर्थिक आणि कृषी शिक्षण हे विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक विषयगटात सांघिक प्रथम पारितोषिक ₹१५,०००/- + चषक, सांघिक द्वितीय पारितोषिक ₹१०,०००/- + चषक, सर्वोत्कृष्ट लेखनासाठी ₹२,०००/-, सर्वोत्कष्ट दिग्दर्शनाकरिता ₹२,०००/-, सर्वोत्कृष्ट अभिनेता ₹२,०००/-, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ₹२,०००/-, सर्वोत्कृष्ट वादक कलाकारांसाठी ₹२,०००/- यासोबतच सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेच्या नियम आणि अटींसाठी तसेच अधिक माहितीसाठी शैलेश चव्हाण 98330 28875, राकेश तळगांवकर 86522 01870 यांच्याशी किंवा ईमेल: kavyashailicreations@gmail.com येथे संपर्क साधू शकता.
No comments:
Post a Comment