Sunday 28 January 2024

इंग्लंडने पहिली कसोटी २८ धावांनी जिंकली, हार्टलेने घेतले ७ बळी, इंग्लंडची मालिकेत १-० आघाडी

 


इंग्लंडने पहिली कसोटी २८ धावांनी जिंकली, हार्टलेने घेतले ७ बळी, इंग्लंडची मालिकेत १-० आघाडी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : हैदराबादमध्ये भारताविरुद्ध खेळवण्यात आलेली पहिली कसोटी इंग्लंडने चौथ्या दिवशीच जिंकली.  इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ४३६ धावा केल्या आणि १९० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४२० धावा केल्या आणि भारताला २३१ धावांचे लक्ष्य मिळाले. त्याचा पाठलाग करताना टीम इंडिया २०२ धावांवर नांगी टाकली आणि सामना गमावला.


भारताकडून बाद झालेला शेवटचा फलंदाज मोहम्मद सिराज होता. त्याने टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यष्टिचित झाला. पदार्पणाच्या कसोटीत डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात ७ बळी घेतले. या सामन्यात त्याने एकूण ९ विकेट घेतल्या.


तत्पूर्वी, रविचंद्रन अश्विन ८४ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. टॉम हार्टलेच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचित झाला. त्याचवेळी केएस भरतची विकेटही हार्टलीच्या झोळीत आली. केएस भरत आणि अश्विन यांच्यात ८व्या विकेटसाठी ५० हून अधिक धावांची भागीदारी झाली.


चहापानानंतर भारताला ७ धक्के बसले. प्रथम अक्षर पटेलला टॉम हार्टलेने बाद केले. अक्षर १७ धावा करून बाद झाला. यानंतर जो रूटने केएल राहुलला पायचीत टिपले. राहुलला केवळ २२ धावा करता आल्या. यानंतर रवींद्र जडेजा धाव चोरण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. यानंतर श्रेयस अय्यरही तंबूमध्ये परतला आहे.  रोहित शर्मा ३९, यशस्वी जैस्वाल १५ आणि शुभमन गिल शून्यावर बाद झाले.


चौथ्या दिवशी ३३९ धावसंख्येवर इंग्लंडला सातवा धक्का बसला. रेहान अहमद २८ धावा करून बाद झाला.  जसप्रीत बुमराहने त्याला केएस भरतकरवी विकेटच्या मागे झेलबाद केले. यानंतर टॉम हार्टली आला आणि त्याने ओली पोपला चांगली साथ दिली. दोघांमध्ये ८व्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी झाली. नवीन चेंडू मिळताच अश्विनने ही जोडी फोडली. त्याने हार्टलीला ३४ धावांवर बाद केले. यानंतर रवींद्र जडेजाने मार्क वुडला बाद केले. पुढच्याच चेंडूवर ओली पोप त्रिफळाचीत झाला. तो १९६ धावा करून बाद झाला.


पहिल्या डावात १०० हून अधिक धावांची आघाडी घेतल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाने कसोटी गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २००२ मध्ये बर्मिंगहॅम कसोटीत भारताने पहिल्या डावात १३२ धावा करूनही इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला होता.


याचा अर्थ असा की बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली आणि ब्रेंडन मॅक्युलमच्या प्रशिक्षणात भारताने १०० धावांची आघाडी घेतल्यानंतर पराभूत होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या गॅले कसोटीत टीम इंडियाने पहिल्या डावाच्या आधारे १९२ धावांची आघाडी घेत सामना गमावला होता. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरोही ऑली पोप होता. तोच सामन्याचा सामनावीर ठरला.


भारतातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.  पहिल्या डावात 190 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारत हा सामना हरेल असे कोणालाच वाटले नव्हते. इंग्लंडने केवळ भारताची आघाडी कमी केली नाही तर भारताला २३१ धावांचे लक्ष्य दिले जे भारताला गाठता आले नाही.

इंग्लंडसाठी ही कसोटी दोन खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे लक्षात राहील. दुसऱ्या डावात फलंदाज ऑली पोपच्या १९६ धावा आणि टॉम हार्टले यांच्यातील शानदार भागीदारीमुळे इंग्लंडला सामन्यात पुनरागमन केले. हार्टलेने ३४ धावांची खेळी खेळली.

भारताला विजयासाठी २३१ धावा करायच्या होत्या पण दुसऱ्या डावात फिरकीपटू टॉम हार्टलीच्या फिरकीपुढे भारतीय खेळाडू हतबल दिसत होते आणि संपूर्ण संघ २०२ धावांत आटोपला. हार्टलेने ६२ धावांत ७ बळी घेतले.

भारतीय संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे दुसऱ्या डावातील आघाडीच्या फळीचे अपयश. शुभमन गिल सामन्याच्या दोन्ही डावात अपयशी ठरला आणि त्याची बॅट शांत राहिली. पहिल्या डावात केवळ २३ धावा करणारा शुभमन दुसऱ्या डावात दुसऱ्या चेंडूवर शून्यावर बाद झाला.

टीम इंडियाच्या पराभवात श्रेयस अय्यर हा दुसरा खलनायक ठरला.  पहिल्या डावात ३५ धावा करणारा श्रेयस अय्यर दुसऱ्या डावात बाद झाला जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती. ११९ धावांवर भारताची सहावी विकेट जडेजाच्या रूपाने पडल्यानंतर श्रेयसनेही त्याच धावसंख्येवर आगेकूच सुरू ठेवली. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघ दडपणाखाली आला आणि त्यातून सावरला नाही.

भारताची धावसंख्या ५ बाद १०७ अशी झाल्यानंतर संघाला विजयाकडे नेण्याची जबाबदारी श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा यांच्यावर येऊन पडली, पण एक धाव घेतल्यानंतर जडेजाचा धावबाद हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.  कसोटी सामन्यात धावबाद होणे हा गुन्हा मानला जातो, पण जडेजाने धावबाद होण्याची चूक केली. भारतीय पराभवाचे हे तिघे मुख्य खलनायक ठरले.

No comments:

Post a Comment