तब्बल १२ वर्षांनंतर टी२० विश्वचषक सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरने झाला. 39 वर्षीय डेव्हिड विसीने सुपर ओव्हरमध्ये नामिबियाला मिळवून दिला विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बार्बाडोस येथे नामिबिया आणि ओमान यांच्यात खेळला गेलेला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील सामना सुपर ओव्हरमध्ये निकाली लागला. स्पर्धा सुरू होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत, मात्र तिसऱ्या सामन्यातच चाहत्यांना सुपर ओव्हरची मजा बघायला मिळाली. ओमानने प्रथम फलंदाजी करताना १०९ धावा केल्या होत्या, परंतु नामिबियाचा संघ २० षटकांनंतर ६ बाद १०९ धावाच करू शकला आणि सामना बरोबरीत राहिला. यानंतर, सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लावण्यात आला. जिथे डेविड विसीसह कर्णधार गेरहार्ड एरासमसने तुफानी फलंदाजी करत विजयाची नोंद केली. तब्बल १२ वर्षांनंतर या जागतिक स्पर्धेतील कोणत्याही सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला आहे.
नामिबियाला शेवटच्या षटकात सहा विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी पाच धावांची गरज होती. ओमानसाठी मेहरार खान गोलंदाजीसाठी आला आणि त्याने केवळ चार धावा दिल्या, तर दोन विकेट्सही घेतल्या. नामिबियाला विजयासाठी एका चेंडूवर दोन धावांची गरज होती. विसीचा चेंडू चुकला आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. विसी धाव घेण्यासाठी धावला आणि यष्टीरक्षकाकडून धावबाद हुकला. अशाप्रकारे २० षटक संपल्यानंतर दोन्ही संघांची धावसंख्या एकसमान झाली. ओमानविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये नामिबियाचा फलंदाज डेविड विसी आणि कर्णधार एरासमस यांनी २१ धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांनी वेगवान गोलंदाज बिलाल खानला चांगलाच चोप दिला.
बिलालच्या पहिल्या चेंडूवर विसीने चौकार मारला, तर दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर दोन धावा आणि चौथ्या चेंडूवर एकच धाव घेतली. यानंतर एरासमसने पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला. नामिबियासाठी विसीने सुपर ओव्हरमध्ये १३ धावा केल्या, तर एरासमसने आठ धावांचे योगदान दिले. यानंतर कर्णधाराने विसीच्या गोलंदाजीवर विश्वास व्यक्त केला. विसीने केवळ १० धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली.
टी२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चार वेळा सामना बरोबरीत सुटला आहे, मात्र केवळ तीन वेळाच सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे झाला आहे. २००७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळीचा सामना बरोबरीत संपला आणि या सामन्याचा निकाल बॉल आउटमध्ये गेला. यामध्ये दोन्ही संघांच्या सहा गोलंदाजांना विकेटवर सहा चेंडू टाकावे लागले आणि भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानपेक्षा जास्त वेळा स्टंपवर चेंडू टाकून हा सामना जिंकला. टी२० विश्वचषकात तिसऱ्यांदा असे घडले जेव्हा सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने ठरला. मात्र, २०१२ नंतर टी२० विश्वचषक स्पर्धेत सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यापूर्वी २०१२ मध्ये कँडी येथे न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्याचा निकालही सुपर ओव्हरद्वारे लागला होता ज्यामध्ये श्रीलंकेचा विजय झाला होता. याशिवाय २०१२ मध्येच वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातील मॅचचा निर्णयही सुपर ओव्हरद्वारे झाला होता, तेव्हा तो सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता.
नामिबियाला शेवटच्या षटकात सहा विकेट्स शिल्लक असताना विजयासाठी पाच धावांची गरज होती. ओमानसाठी मेहरार खान गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर सेट बॅट्समन फ्रीलिंकला बाद केले. यानंतर पुढच्या चेंडूवर जेन ग्रीनला धावा करता आल्या नाहीत आणि तिसऱ्या चेंडूवर मेहरार खानने ग्रीनला पायचीत बाद केले. चौथ्या चेंडूवर मलान क्रुगरने धाव घेतली आणि डेविड विसीला स्ट्राइक दिली. पाचव्या चेंडूवर विसीने दोन धावा घेतल्या. आता संघाला विजयासाठी एका चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. विसीचा चेंडू चुकला आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. विसी धाव घेण्यासाठी धावला आणि यष्टीरक्षकाकडून धावबाद हुकला. अशाप्रकारे २० षटक संपल्यानंतर दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरी राहिली.
नामिबियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू डेविड विसीने ओमानविरुद्ध टी२० विश्वचषकातील गट-ब सामन्यात दमदार कामगिरी केली आणि सुपर ओव्हरमध्ये संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लावण्यात आला जिथे डेविड विसीसह कर्णधार गेरहार्ड एरासमसने तुफानी फलंदाजी करत विजयाची नोंद केली. ३९ वर्षीय विसीने सुपर ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी करताना नामिबियाने ओमानसमोर विजयासाठी २२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यानंतर विसी गोलंदाजीसाठी आला आणि त्याच्यावर लक्ष्याचा यशस्वी बचाव करण्याची जबाबदारी होती, ती त्याने चोख बजावली आणि नामिबियाच्या विजयाची सुरुवात केली.
डेविड विसीला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment