बाजार सावरला, सेन्सेक्स ७०० अंकांनी मजबूत, निफ्टी २२८०० च्या पार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी टर्म निश्चित होताच, निकालानंतर लगेचच बाजारातून गायब झालेला उत्साह परत येऊ लागला आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक मजबूत बंद झाले. साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ६९२.२७ (०.९३%) अंकांनी वाढून ७५०७४.५१ वर पोहोचला. दुसरीकडे, एनएससी निफ्टी २०१.०६ (०.८९%) अंकांनी वाढून २२८२१.४० वर बंद झाला.
No comments:
Post a Comment