Wednesday, 31 May 2023

'फकाट'च्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे -रसिका सुनीलची 'हॅट्रिक'

 'फकाट'च्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे -रसिका सुनीलची 'हॅट्रिक' 


सध्या 'फकाट' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीही सुयोग आणि रसिकाने चित्रपटात आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे आता 'फकाट'च्या निमित्ताने त्यांची हॅट्रिक होणार आहे. मुळात रसिका आणि सुयोगची पडद्यामागेही घनिष्ट मैत्री असल्याने पडद्यावरही त्यांची केमिस्ट्री तितकीच अफलातून वाटते. त्यांची हीच केमिस्ट्री प्रेक्षकांना येत्या २ जून रोजी पाहायला मिळणार आहे. 

आपल्या या मैत्रीबद्दल सुयोग गोऱ्हे म्हणतो, '' आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांसोबत यापूर्वीही काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन निर्माण झाला आहे. आम्ही खूप धमाल करतो. कधी एकमेकांना कामाबद्दल सल्लेही देतो. मुळात इतक्या वर्षांची मैत्री असल्याने आता आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहित झाले आहेत. कोणत्या परिस्थितीत एकमेकांची रिऍक्शन कशी असेल, याचीही आम्हाला आता कल्पना असते. आम्ही भांडणेही तितकीच करतो.'' तर रसिका या मैत्रीबद्दल म्हणते, ''आमच्या सुरुवातीच्या काळात आम्ही घरही शेअर केले असल्याने एकमेकांची मेहनत, संघर्ष पाहिला आहे. सुयोगला जर एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर त्याचा आनंद सुयोगपेक्षाही मला जास्त होतो. कधी कधी आम्ही वायफळ गप्पा मारत असलो तरी कामाबद्दलची आमची तितकीच चर्चा होते. सुयोग मित्र म्हणून तर बेस्ट आहेच शिवाय एक अभिनेता म्हणूनही तो तितकाच प्रतिभाशाली आहे. सेटवर तो त्याच्या व्यक्तीरेखेचा गांभीर्याने अभ्यास करतो.'' 


वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित, श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Tuesday, 16 May 2023

Federal Bank Inaugurates New Branch in Ambernath, Expanding its Presence in Maharashtra



 Federal Bank Inaugurates New Branch in Ambernath, Expanding its Presence in Maharashtra

 

Federal Bankproudly announces the inauguration of its Ambernath branch, marking its 163rd branch in the Mumbai Zone. The new branch is located at A7-10 Nana Patil Pride, Opp Old Police Station, Near Bethel Church, Kohojgaon, Ambernath (W).

 

The inauguration ceremony took place with esteemed dignitaries gracing the occasion. Mr Rajesh Agarwal, Chief General Manager, MPF (Unit of Armoured Vehicles Nigam Ltd), Government of India, inaugurated the branch premises. Mr S M Salve, General Manager (HR& Admin) MPF (Unit of Armoured Vehicles Nigam Ltd), Government of India, inaugurated the branch ATM. Mr M P Ajay Kumar, Managing Director, Unico Infra Engineers Pvt Ltd, inaugurated the Strong Room of the branch premises. Mr Pradip Patil, Managing Partner of Patil Builders & Developers, inaugurated the lockers. The event was presided by Mr Mahesh R, Senior Vice President and Zonal Head, Mumbai.

 

The branch premises feature modern infrastructure, state-of-the-art technology, and a welcoming ambiance to ensure a convenient banking experience for customers. In addition to a wide range of banking services, the branch offers various facilities, including locker facilities for the safekeeping of valuable possessions.It offers a comprehensive range of banking products and services to the local community. The branch will cater to the financial needs of individuals, businesses, and corporates in the area, providing them with personalized solutions and exceptional customer service.

 

MrMahesh R, Senior Vice President and Zonal Head, Mumbaiof Federal Bank, said, "We are delighted to inaugurate our new branch in Ambernath, further expanding our footprint in the Navi Mumbai region. We are committed to delivering exceptional customer experiences and forging strong relationships within the community."

 

Federal Bank continues to focus on leveraging technology and innovation to enhance its banking services, ensuring customers have seamless access to their accounts through digital channels. The Bank remains dedicated to offering a wide range of retail, corporate, and treasury products, as well as customized solutions to meet the evolving financial needs of its customers.

 

M V S Murthy  

Chief Marketing Officer  

Friday, 12 May 2023

Multispecialty Hospital Chain, Jupiter Life Line Hospitals files DRHP for IPO

 Multispecialty Hospital Chain, Jupiter Life Line Hospitals files DRHP for IPO

 

Mumbai-based hospital chain Jupiter Life Line Hospitalsis among the key multi-specialty tertiary and quaternary healthcare providers in the Mumbai Metropolitan Area (MMR) and western region of India with a total bed capacity of 1,194 hospital beds across three hospitals as of December 31, 2022 has filed its draft red herring prospectus (DRHP) with capital market regulator Sebi to raise funds through for its initial public offering (IPO).

The issue with a face value of Rs 10 per equity share consists of a fresh issue of equity shares worth up to Rs 615 crore and an offer-for-sale (OFS) of up to 4.45 million equity shares by Promoter Groupand other selling shareholders.

The offer for sale comprises of up to 1.25 million equity shares by Devang Vasantlal Gandhi (HUF), up to 9 lakh equity shares by Devang Gandhi jointly with Neeta Gandhi, up to 1million equity shares by Nitin Thakker jointly with Asha Thakker, up to 4 lakh equity shares by AnuradhaRamesh Modiwith MeghaRamesh Modi (astrustees for thebenefit of ModiFamily PrivateTrust), and up to 4 lakh equity shares by Bhaskar P Shah (HUF), up to 2 lakh equity shares by Rajeshwari Capital Market Limited, up to 2 lakh equity shares by Vadapatra Sayee Raghavan (HUF), up to 40,000 equity shares by Sangeeta Ravat jointly with Dr. Hasmukh Ravat, up to 40,000 equity shares by Dr. Hasmukh Ravat jointly with Sangeeta Ravat, up to 20,000 equity shares by Shreyas Ravat jointly with Sangeeta Ravat.

The Offer is being made through the Book Building Process, wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers, not less than 15% of the Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Portion.

The company, in consultation with the lead bankers to the issue, may consider a further issue of specified securities for a cash consideration aggregating up to Rs 123 crore (“Pre-IPO Placement”). If such placement is completed, the fresh issue size will be reduced.

As per the DRHP, the proceeds from the issue will be utilized to the extent of Rs. 463.90 crore for repayment/ pre-payment, in full or in part, of borrowings availed from banks by the company and material subsidiary and general corporate purposes.

Led by founder, Chairman and Managing Director, Dr.Ajay P Thakker with over 3 decades of experience in the field of medicine and healthcare and Dr. Ankit Thakker, Chief Executive Officer who has a decades experience in the healthcare sector , the hospitalbegan as a single hospital in Thane in 2007 and has been operating for over 15 years as a corporate quaternarycare healthcare service provider in the western regions of India. It currently operates inThane, Pune and Indore under the “Jupiter” brand.

 

Jupiter Hospitals has a strategic focus on on the western india healthcare market. It currentlyin the process of developing a multispecialty hospital in Dombivli, Maharashtra, which is being designed to accommodate over 500 beds. The construction of the hospital began in April 2023 and will be spread across 600,000 sq feet

 

It follows a patient first ideology and operates on a "all-hub, no-spoke" model with each hospital being a full-service hospital, operating independently, and serving the healthcare needs of patients, right from diagnostics to surgery and rehabilitation across 30 different specialties

 

Across all its hospital assets it has a very low dependence on central and state government schemes and has an almost equal sharebetween self-payers and those come via insurance companies, third party administrators and corporations.

 

According to the CRISIL Report in its DRHP, the Thane and Indore hospitals are amongst thefew hospitals in the western region of India to provide neuro rehabilitation services through a dedicated roboticand computer-assisted neuro rehabilitation centre. Additionally, it operates one of the few multi-organtransplant centres in Thane with NABH Safe-I certification and the NABH ‘Nursing Excellence’accreditation.

 

Jupiter Life Line Hospitals has turned around from making a lossin FY21 to a profit of Rs 51.13 Cr in FY22, whereas revenue from operations grew 50.80% to Rs 733.12 crore in FY2021-22 from Rs 486.16 crore in FY 2021-22, primarily driven by an increase in both inpatient and outpatient incomes.

 

For the nine months ended December 31, 2022 revenue from operations stood at Rs 650.24 crore and profit after tax stood at Rs 57.15 crore, whereas EBITDA margin stood at 23.84%.

ICICI Securities Limited, Edelweiss Financial Services Limited, and JM Financial Limited are the book running lead managers and KFin Technologies Limited is the registrar to the offer. The equity shares are proposed to be listed on BSE and NSE.

 

 

Thursday, 11 May 2023

आयडीफोर्जकडून अद्ययावत नेत्रा व्ही4प्रो चे एक्सपोनेंशियल 2023 मध्ये अनावरण

 आयडीफोर्जकडून अद्ययावत नेत्रा व्ही4प्रो चे एक्सपोनेंशियल 2023 मध्ये अनावरण

डेनेव्हेर, कॉलरॅडो, 10 मे, 2023 – 1लॅटिसच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2022 मध्ये भारतातील मानवविरहित विमाना प्रणाली (युएव्ही) क्षेत्रातील 50% बाजारपेठेचा हिस्सा असलेल्या आयडीयाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या सदर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने अद्ययावत युएव्ही, नेत्रा व्ही4 प्रो चे एक्स्पोनेंशियल 2023 मध्ये अनावरण केले आहे ज्याची उडाण क्षमता 90 मिनिटे आहे. 

नेत्रा व्ही4 प्रो हा आयडीयाफोर्ज विकसित केलेल्या नेत्रा सिरिज युएव्ही मधील नवीन समावेश आहे. नेत्रा व्ही4 प्रो बाबत मुख्य सुधारणा ही 90 मिनिटे उडण्याची क्षमता ही आहे. हे 10 मैलांपर्यंत प्रवास करू शकते. नेत्रा व्ही4 प्रो चा वापर संरक्षण, लोकांच संरक्षण, आपत्काल प्रतिसाद आणि मॅपिंग अशा विविध बाबींसाठी करता येऊ शकतो. 

“नेत्रा सिरिज युएव्हींची रचना ही विविध प्रकारच्या वापरांसाठी करण्यात आली आहे आणि नेत्रा व्ही4 प्रो मध्ये 90 मिनिटे एवढी विस्तारीत उडण्याची क्षमता आहे”, असे आयडियाफोर्जचे सीईओ अंकित मेहता म्हणाले. ते पुढे असे ही म्हणाले की “एक्सपोंशियल हा फक्त एक कार्यक्रमच नाही तर जागतिक युएव्ही उद्योगातील तंत्रज्ञान सादर करण्यासाठीचे जागतिक व्यासपीठ आहे. नेत्रा व्ही4 प्रो अशा जागतिक स्तरावरील व्यासपिठावर सादर करताना आयडियाफोर्जला आपले नवीन शोधही सादर करण्याची संधी मिळत आहे. 


नेत्रा व्ही4 प्रो सादर करण्याबरोबरच आडियाफोर्जने ‘अर्ली अडॉप्टर प्रोग्राम (इएपी) ही अमेरिका आणि कॅनडात चालू केला आहे ज्याद्वारे ग्राहकांना आयडियाफॉर्जची युएव्ही कोणतीही प्राथमिक गुंतवणूक न करता चाचणी म्हणून वापरून पाहता येऊ शकतील. सदर योजना ग्राहकांना 90 मिनिटांची उडाण क्षमता असलेल्या अद्यावत नेत्रा व्ही4 प्रो चा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊ शकेल. या योजनेत सहभागी झाल्यानंतर ग्राहकांना युएव्ही सवलतीच्या दरात विकत घेता येऊ शकेल. इएपी अंतर्गत आद्य वापरकर्ते म्हणून आयडियाफोर्ज अशा ग्राहकांना नवीन फिचर्सची आधी उपलब्धता आणि समर्पित ग्राहक सेवा देऊ शकणार आहे. 

Wednesday, 10 May 2023

JSW Infrastructure files DRHP to raise upto Rs 2,800 crore through IPO route

 JSW Infrastructure files DRHP to raise upto Rs 2,800 crore through IPO route

IPO proceeds to be used to retire debt as well as fund capacity expansion.


JSW Infrastructure, the ports business of the JSW Group has filed the DRHP for its initial public offering with SEBI on 9th May 2023. The Ports business of Sajjan Jindal-led JSW Group plans to raise upto Rs 2,800 crore through the IPO route. The company plans to deploy these funds to retire its debt as well as to fund its capacity expansion projects.


JSW Infrastructure has emerged as the fastest growing port-related infrastructure company in terms of growth in installed cargo handling capacity and cargo volumes handled during Fiscal 2020 to Fiscal 2022, and the second largest commercial port operator in India in terms of cargo handling capacity in Fiscal 2022”. As at December 31, 2022, JSW Infrastructure has an installed cargo handling capacity of 153.43 million tonnes per annum for multi-commodity cargo including dry bulk, break bulk, liquid bulk, gases and containers.  JSW Infrastructure’s port business operations have expanded from one Port Concession at Mormugao in Goa that was acquired by the JSW Group in 2002 and commenced operations in 2004, to nine Port Concessions as of December 31, 2022 across India, making it a well-diversified maritime ports company. Additionally, company is into O& M contracts of 2 ports in UAE, at Fujairah Terminal and Dibba Terminal having a collective capacity of 41 mmtpa.


JSW Infrastructure has in the past acquired Port Concessions in the states of Tamil Nadu and Karnataka as part of its efforts to increase cargo handling capacity, expand its footprint across geographies and products and to cater to growing cargo volumes. As part of its strategy, the company plans to further expand its asset portfolio and grow its operations by evaluating acquisition opportunities to strengthen its presence in handling container and liquid cargo, with a focus on increasing its third-party customer base.


The JSW Infrastructure IPO is the third public listing by the JSW Group and follows 13 years after the public listing of JSW Energy in January 2010. JSW Infrastructure Promoters will not be diluting their current stake.


JSW Infrastructure has shown very strong CAGR growth in all key parameters in terms of, Cargo volume 35%, revenue 41% from Rs 1,143.15 crore in FY 2019-20 to Rs 2,273.06 crore in FY 2021-22, EBITDA 31% from Rs 713.42 crore in FY 2019-20 to Rs 1,215.11 crore in FY 2021-22 & PAT 30% from Rs 196.53 crore in FY 2019-20 to Rs 330.44 crore in FY 2021-22.


For the nine months ended December 31, 2022, it handled a cargo volume of 66.70 million metric tons (MMT), revenue from operations stood at Rs 2,279.44 crore and profit after tax stood at Rs 447.24 crore, whereas EBITDA margin stood at 52.87% and has a net debt of Rs 2,875 crore.


JM Financial Limited, Axis Capital Limited, Credit Suisse Securities (India) Private Limited, DAM Capital Advisors Limited, HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited, ICICI Securities Limited, Kotak Mahindra Capital Company Limited, and SBI Capital Markets Limited are the book running lead managers and KFin Technologies Limited is the registrar to the offer. The equity shares are proposed to be listed on BSE and NSE.

Tuesday, 9 May 2023

हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हेचा 'हल्ला गुल्ला' 'फकाट' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित

 


हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हेचा 'हल्ला गुल्ला' 

'फकाट' चित्रपटातील नवीन गाणे प्रदर्शित 

प्रेमगीत, आयटम सॉंगनंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील एक भन्नाट, उडत्या चालीचे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जिंदगी आता झाली हल्ला गुल्ला' असे बोल असलेल्या या गाण्याला  कौतुक शिरोडकर, हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर यांचे बोल लाभले असून  हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे जबरदस्त संगीत लाभलेले हे गाणे गायलेही त्यांनीच आहे. हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 


हे गाणे ऐकायला जितके स्फूर्तिदायी आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आणि कलरफुल आहे. या गाण्यात हेमंत आणि सुयोगकडे भरपूर पैसा आल्याचे दिसत असून ते भौतिक सुख अनुभवत असल्याचे या गाण्यात दिसतेय. या गाण्यात रॅपही अनुभवायला मिळत आहे. जे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी केले आहे.


या गाण्याबद्दल ट्रिनिटी ब्रदर्स म्हणतात, '' या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसतेय. तरुणाईला आवडेल असे या गाण्याचे शब्द आणि संगीत आहे. तरुणाईचा वेस्टर्न सॉंगकडे कल जास्त आहे. प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे गाणे, संगीतप्रेमींना आवडेल असे आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शकही मराठीतील एक नावाजलेले रॅपर आहेत. त्यामुळे त्यांचाही मदत या गाण्यासाठी झाली आहे. त्यांच्या रॅपने या गाण्यात अधिकच रंगत आणली. हे गाणे करताना मजा आली.'' 


हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, रसिका सुनील, अनुजा साठे, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.

Monday, 8 May 2023

मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'बलोच'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 



मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या 'बलोच'ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यांना परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याचे भयाण वास्तव प्रेक्षकांना ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या 'बलोच' या चित्रपटात अनुभवायला मिळत आहे. खरंतर हा चित्रपट म्हणजे सीमेपार लढलेल्या मराठ्यांची शौर्यगाथा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या स्पर्धेत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट असतानाही प्रेक्षक 'बलोच' चित्रपटाकडे वळताना दिसत आहे. मराठयांची ही शौर्यगाथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली असून अनेकांनी सोशल मीडियावरून 'बलोच'बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कलाकारांचे, दिग्दर्शकांचे कौतुक होत असतानाच चित्रपटातील गाणीही रसिकांना आवडत आहेत. अंगावर रोमांच आणणारी लढाई आणि दमदार संवाद मनाला भिडणारे आहेत. एक लढवय्या आणि त्याचे सहकारी यांची विजयगाथा सांगणारा हा ऐतिहासिक चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी गोळा करण्यात यशस्वी होत आहे. 


चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, " हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून या सिनेमाचे काम सुरु होते. मुळात हा ऐतिहासिक चित्रपट असल्याने काहीही पडद्यवर दाखवताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची आम्ही हरप्रकारे काळजी घेतली. 

त्यामुळे संपूर्ण इतिहास व्यवस्थित जाणून घेऊन मगच आम्ही तो पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जी चित्रपट पाहताना पडद्यावर दिसतेच. आम्हाला फार आनंद होतोय की, आमची ही मेहनत, आमचा हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय. मी  आवाहन करेन, हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा.'' 


अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी. के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, रमेश परदेशी, अमोल कागणे, सुरभी भोसले यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत,  ‘बलोच’च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी जोशी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार'

 


ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी जोशी यांना  'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार' 

'सांस्कृतिक कलादर्पण' पुरस्कार सोहळा संपन्न 

पडद्यावरील, पडद्यामागील कलाकारांचा सन्मान 


मनोरंजन क्षेत्रात मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार म्हणजे चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 'सांस्कृतिक कलादर्पण' पुरस्कार. पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या कलाकृतीचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून नुकताच हा दैदिप्यमान सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपट, नाटक, मालिका, तंत्रज्ञ, पत्रकारिता, अशा विविध विभागातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या भव्य सोहळ्याला कलासृष्टीला अनेक तारेतारका, मान्यवर उपस्थित होते.  


या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना 'सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. चित्रपट विभागात 'मदार' चित्रपटाने बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट अभिनेतासाठी प्रसाद ओक ( धर्मवीर मु. पो. ठाणे) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी शिवाली परब ( प्रेम कथा धुमशान) आणि अमृता अग्रवाल (मदार) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पिकासो, इंटरनॅशनल फालम फोक, वाळवी, ताठकणा, गावं आलं गोत्यात १५ लाख खात्यात, पांडू, बालभारती, टाइमपास ३, आता वेळ आली, शहीद भाई कोतवाल या चित्रपटांनीही विविध विभागात पुरस्कार प्राप्त केले आहेत. यावेळी नाट्य विभागात 'सफरचंद' या नाटकाने सर्वात जास्त पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली असून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशा विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. तर चर्चा तर होणारच, कुर्र, पुनश्च हनिमून, वाकडी तिकडी, वुमन या नाटकांनाही विविध विभागांत पुरस्कार मिळाले आहेत. तर टि. व्ही. मालिका विभागात संत गजानन शेगावीचे ( सन मराठी टि. व्ही)मालिकेने 'सर्वोत्कृष्ट मालिके'चा मान मिळवला असून लक्षवेधी मालिकेचा पुरस्कार 'ठिपक्यांची रांगोळी'(स्टार प्रवाह) ला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार शशांक केतकर (मुरंबा) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार ज्ञानदा रामतीर्थकर (ठिपक्यांची रांगोळी) यांना मिळाला आहे. तुमची मुलगी काय करते, बॉस माझी लाडाची यांनीही पुरस्कार पटकावले. तर पत्रकारिता विभागातही अनेकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


या सोहळ्याविषयी संस्थापक, अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे म्हणतात, "अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्याची शान वाढवली. यापैकी काही मान्यवर खूप वर्षांपासून आमच्या परिवारात आहेत तर काही मान्यवर नव्याने आमच्या परिवारात सहभागी झालेत. त्या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो. कला क्षेत्रातअमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलावंतांना  प्रोत्साहन देण्याचे आम्ही मागील अनेक वर्षांपासून करतोय. अशीच उत्तमोत्तम कलाकृती वर्षानुवर्षं या कलाकारांकडून होवो, अशीच इच्छा व्यक्त करतो. या दिमाखदार सोहळ्याचे ब्रॉडकॉस्ट पार्टनर ‘सन मराठी टि. व्ही. होते. लवकरच हा भव्य सोहळा सन मराठी टि. व्हीवर पाहायला मिळेल.’’

सरी'ला लाभले ‘कांतारा’च्या बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत



 सरी'ला लाभले ‘कांतारा’च्या बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत


 'लाईफ इज फुल्ल ऑफ सरप्राइजेस अँड मिरॅकल्स' अशी टॅगलाईन असलेल्या 'सरी' चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरत आहे. अनेक कलाकारांनीही हा चित्रपट चांगला असल्याचे आपल्या सोशल मीडियावरून सांगितले आहे. चित्रपटाची कथा, कलाकार या सगळ्या जमेच्या बाजू असतानाच या चित्रपटाच्या संगीताचीही संगीतप्रेमींना भुरळ पडली आहे. मंदार चोळकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना अमितराज आणि अरजीत चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे. याशिवाय 'सरी'ची खासियत म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत 'सरी' चित्रपटाला लाभले आहे. यापूर्वी  बी. अजनीश लोकनाथ  यांनी 'कांतारा' या सुपरहिट चित्रपटाला संगीत दिले होते. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अशोका के. एस. आणि अभिनेता पृथ्वी अंबर मराठीत पदार्पण करत आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित, रिलायन्स एंटरटेनमेंट प्रदर्शित 'सरी'मध्ये अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


प्रेमाची परिभाषा सांगणाऱ्या 'सरी'मध्ये प्रेमाचा त्रिकोण असून दिया ( रितिका श्रोत्री) अखेर कोणाचा स्विकार करणार रोहित ( अजिंक्य राऊत) की आदीचा (पृथ्वी अंबर), हे सरप्राईज प्रेक्षकांना ‘सरी’ पाहिल्यावरच मिळेल.या चित्रपटात मैत्री, प्रेम, विनोद, भावना, नात्याचे महत्व असे मनोरंजांचे संपूर्ण पॅकेजच पाहायला मिळणार आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, '' अतिशय साधेपणाने आम्ही ही कथा मांडली असून मनाच्या खोलवर जाणारी ही कथा आहे. नात्यांबद्दल विचार करायला लावणारी ही कथा आहे. 'सरी'ची गाणीही अतिशय श्रवणीय आहेत. इतकी तगडी संगीत टीम या चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही प्रेक्षकांच्या डोक्यात ही कथा रेंगाळत राहील.'' तर दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माते डॅा. सुरेश नागपाल म्हणतात, '' हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. मुळात हा चित्रपट मराठीत येतोय, हीच आनंदाची गोष्ट आहे. या चित्रपटाची कथा खूप सुंदर असून मनाला स्पर्शून जाणारी आहे. सगळे प्रभाशाली कलाकार असलेला हा चित्रपट सर्वांनी नक्कीच पाहावा, असा आहे.'' तर संगीतकार बी. अजनीश लोकनाथ म्हणतात, ‘पहिल्यांदाच मी मराठी गाण्याला संगीत दिले आहे. अमितराज आणि अरजीत चक्रवर्ती यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव अनोखा होता. मंदार चोळकर यांच्या शब्दांना संगीतात  गुंफताना मजा आली. एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल आहे. पुन्हा मराठीत काम करायला मला निश्चितच आवडेल.’’

Friday, 5 May 2023

साहिल आणि हिनाचे वाद जाणार विकोपाला? 'चिकतगुंडे २'चा चौथा एपिसोड शुक्रवारी झळकणार





 साहिल आणि हिनाचे वाद जाणार विकोपाला? 

'चिकतगुंडे २'चा चौथा एपिसोड शुक्रवारी झळकणार 


भाडिपा आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत 'चिकटगुंडे २' ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. गौरव पत्की दिग्दर्शित 'चिकटगुंडे २'चा चौथा एपिसोड येत्या शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. यात साहिल (पुष्कराज चिरपुटकर) आणि हिना (स्वानंदी टिकेकर) ही जोडी दिसणार आहे. 'चिकटगुंडे'च्या पहिल्या सीझनमध्ये या दोघांमधील खट्याळपणा, निरागस प्रेम बघितले. आता सिझन २ मध्ये या दोघांचे नाते अधिकच बहरलेले दिसणार आहे. 


नोकरी सोडून वर्षभरापासून घरात बसलेल्या साहिलने दोन छोट्या गेंड्यांसाठी लाखो रूपये खर्च केले असून या गोष्टीवरून हिना आणि त्याच्यात वादावादी होत आहे. आता हे गेंडे त्याने का घेतले आणि त्याच्यावरून हा वाद किती विकोपाला जाणार की त्यांच्यातील अवखळ प्रेमामुळे हा वाद तिथेच संपणार याचे उत्तर 'चिकटगुंडे २' पाहिल्यावरच मिळेल. 


प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्रेक्षकांना हलकाफुलका कॉन्टेन्ट पाहायला आवडतो. भाडीपाचे विषय हे नेहमीचे साधे, सर्वसामान्य प्रेक्षकांना आपल्या जवळचे वाटणारे असतात. घराघरातील सरळ, साधी गोष्ट प्रेक्षकांना नेहमीच भावते. सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्गाला केंद्रस्थानी ठेऊन 'भाडिपा' वेगवेगळ्या विषयांवरील वेबसीरिज घेऊन येत असते. 'चिकटगुंडे २' ही सुद्धा अशीच सीरिज असून या वेबसीरिजचा चौथा एपिसोड आणि शेवटच्या एपिसोडमध्येही काहीतरी खास, आश्चर्यजनक अनुभवायला आणि पाहायला मिळेल."

लंडनमध्ये संपन्न झाले 'कैरी'चे चित्रीकरण







लंडनमध्ये संपन्न झाले 'कैरी'चे चित्रीकरण 


नुकतेच 'कैरी' या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण पार पडले. हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, हे जरी अद्याप कळले नसले तरी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका असल्याचे कळतेय. याव्यतिरिक्त या चित्रपटात अरुण नलावडे, सुलभा आर्या आणि काही ब्रिटिश कलाकारही आहेत. 'कैरी'चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक शंतनु रोडे यांनी केले असून यापूर्वी त्यांनी गोष्ट 'गोष्ट एका पैठणीची'चे दिग्दर्शक केले होते. 'कैरी'च्या निमित्ताने पुन्हा एकदा पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक - अभिनेत्री म्हणजेच शंतनु रोडे आणि सायली संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय 'कैरी'चे 'पोस्टर'ही झळकले असून त्यात एक पाठमोरी मुलगी हातात सामान घेऊन परदेशात फिरताना दिसतेय. त्यामुळे आता हा चित्रपट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. 


या चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड यांनी ९१ फिल्म स्टुडिओज बॅनर अंतर्गत केली असून निनाद बत्तीन, तबरेझ पटेल, एव्हीके एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. ' कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी आणि शंतनु रोडे यांनी केले आहे. 


९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा यांनी आतापर्यंत दहा प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून यात मराठी, मल्याळम, बंगाली आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.


९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा म्हणतात, '' हा आमचा तिसरा मराठी चित्रपट आहे. अतिशय प्रतिभाशाली कलाकारांसोबत आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करतानाचा अनुभव आनंददायी होता. लंडनमधील हवामानाचा अंदाज नसतानाही आम्ही वेळापत्रकानुसार चित्रीकरण पूर्ण करण्यात यशस्वी झालो. या वर्षाच्या अखेरीस 'कैरी' चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे.'' 


'कैरी'चा काही भाग कोकणातही चित्रीत झाला आहे.

सरी'तील 'बदलली वाऱ्याने दिशा' हे विरहगीत प्रदर्शित



 सरी'तील 'बदलली वाऱ्याने दिशा' हे विरहगीत प्रदर्शित 

प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी आयुष्यात कोणालाच सहजासहजी मिळत नाही. प्रेमीयुगुलांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी स्वतःशीच तर कधी कुटुंबाशी, समाजाशी लढाई करावी लागते. प्रेमात एकमेकांना समजून घेत शेवटपर्यंत सोबत पुढे जाणे, हीच प्रेमाची खरी परीक्षा असते. प्रेमाची हीच अग्निपरीक्षा दाखवणारे 'सरी' चित्रपटातील 'बदलली वाऱ्याने दिशा' हे भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंदार चोळकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील हे गाणे मनाला भिडणारे आहे. 


या गाण्यात दिया (रितिका श्रोत्री) आणि आदी (पृथ्वी अंबर) यांच्या मनातील तगमग दिसत असून विरहाचे हे गाणे मन हेलावणारे आहे. यात रोहितचीही (अजिंक्य राऊत) झलक दिसत आहे. त्यामुळे आता यात नक्की कोणाला प्रेमाचा त्याग करावा लागणार, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 


दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, " या चित्रपटातील दोन गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली असून त्यांना संगीतप्रेमींचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. प्रेमातील तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यांनंतर 'सरी'मधील भावनिक गाणं आता प्रदर्शित झालं आहे. याचे बोल मनाला स्पर्श करणारे आहेत. प्रेमात विरह आल्यावर जी मनाची घालमेल होते, ती या गाण्यातून व्यक्त होत आहे.'' 


कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अशोका के. एस. असून रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई'



 प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई' 


१९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातील 'भाई भाई' हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हटक्या चालीवर आपोआप थिरकायला लावणारे हे गाणे हर्षवर्धन वावरे आणि आदित्य पाटेकर यांनी गायले असून या गाण्याला हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. 


या गाण्यात हेमंत, सुयोग आणि नितेश एकदम जल्लोषात नाचताना दिसत असून जॉली भाटियाच्या कातिल अदांनी ते घायाळ झाले आहेत. या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुयोगचे नृत्यकौशल्य पाहायला मिळत असून हेमंत आणि नितेशनेही एकदम फकाट डान्स केला आहे. या गाण्यात दिग्दर्शक श्रेयश जाधवचीही झलक पाहायला मिळत आहे. एकंदरच हे उत्स्फूर्त गाणं प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. 


या गाण्याबद्दल दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, " हे उत्साहाने भरलेले गाणे प्रत्येकाला नाचायला लावणारे आहे. ट्रिनिटी ब्रदर्सने या गाण्याला चारचांद लावले आहेत. या गाण्याचा किस्सा म्हणजे सेटवरचे अनेक जण शूटदरम्यान नाचायचे. इतकी या गाण्याच्या संगीताची ताकद आहे. त्यामुळे चित्रीकरणात विलंब व्हायचा. अखेर शूटच्या दरम्यान कॅमेरासमोर सगळ्यांना ठेका धरायला लावला. तरुणाईला आवडेल असे हे गाणे आहे. 


हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा असलेल्या 'फकाट' या चित्रपटात अविनाश नारकर, हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, नितेश चव्हाण, रसिका सुनील, अनुजा साठे, किरण गायकवाड, कबीर दुहान सिंग आणि महेश जाधव यांनी प्रमुख भूमिका असून हा चित्रपट महाराष्ट्रातील चित्रपटगृहात लवकरच प्रदर्शित होणार आहे.

'अनलॉक जिंदगी' चित्रपटाला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नामांकने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

 


'अनलॉक जिंदगी' चित्रपटाला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची नामांकने 

दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित 


महामारी काळातील भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. 'अनलॉक जिंदगी'ने आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन, १३ व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टीव्हल अशा अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकने मिळवली असून दोन पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी मिलान फिल्म अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म' आणि  पिनॅकल फिल्म अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट फिचर फिल्म' या पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. 


या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक राजेश गुप्ता म्हणतात, " आमच्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाची राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड होणे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे फक्त माझे एकट्याचे यश नसून संपूर्ण टीमचे यश आहे. हा चित्रपट त्या काळातील भयाण परिस्थितीवर भाष्य करणारा असून हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. हृदय पिळवटणारा हा काळ होता. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्याशी समरूप वाटतील.'' 


रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांनीच केले असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. येत्या १९ मे रोजी 'अनलॉक जिंदगी' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Tuesday, 2 May 2023

'अनलॉक जिंदगी' चित्रपट ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित



 'अनलॉक जिंदगी' चित्रपट ठरला नऊ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी

दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित 


महामारी काळातील भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली असून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. 'अनलॉक जिंदगी'ने आतापर्यंत शिकागो, टोरांटो, पिनॅकल, मेक्सिको, पॅरिस, न्यूयॉर्क, मिलान, लंडन, १३ अशा अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकने मिळवली असून दोन पुरस्कारही आपल्या नावावर केले आहेत. त्यापैकी मिलान फिल्म अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्म' आणि  पिनॅकल फिल्म अवॉर्ड्समध्ये 'बेस्ट फिचर फिल्म' या पुरस्काराने या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. 


या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक राजेश गुप्ता म्हणतात, " आमच्या 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाची राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड होणे, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे फक्त माझे एकट्याचे यश नसून संपूर्ण टीमचे यश आहे. हा चित्रपट त्या काळातील भयाण परिस्थितीवर भाष्य करणारा असून हा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. हृदय पिळवटणारा हा काळ होता. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्याशी समरूप वाटतील.'' 


रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांनीच केले असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. येत्या १९ मे रोजी 'अनलॉक जिंदगी' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आयुष्याला कलाटणी देणारा 'कानभट' १९ मेपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर



 आयुष्याला कलाटणी देणारा 'कानभट' 

१९ मेपासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर 

नवनवीन विषय हाताळून प्रेक्षकांना मनोरंजनचा खजिना उपलब्ध करून देणे, ही प्लॅनेट मराठी ओटीटीची खासियत आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्लॅनेट मराठी सज्ज झाले आहे. 'कानभट' असे या चित्रपटाचे नाव असून नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. रश प्रॉडक्शन प्रा. लि. निर्मित या चित्रपटाची निर्माती आणि दिग्दर्शिका अपर्णा एस होशिंग आहेत. तर कथा आणि पटकथा अपर्णा एस होशिंग आणि विवेक बोऱ्हाडे यांची आहे. 'कानभट'मध्ये भव्या शिंदे, ऋग्वेद मुळे, संजीव तांडेल, विपीन बोराटे, मनीषा जोशी, अनिल छत्रे आणि विजय विठ्ठल वीर यांच्या प्रमुख भूमिका असून एका लहान मुलाचा भट होण्यापर्यंचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे.

'कानभट' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एका लहान मुलाची मुंज दाखवण्यात आली असून त्याला वेदविद्यालयात पाठवण्यात येत आहे. मात्र त्याच्या मनाविरुद्ध इथे पाठवल्याने त्याच्या बालमनावर झालेला परिणाम यात दिसत आहे. या मुलाच्या आयुष्यात कानभट गुरुजी आल्याने त्याचे आयुष्य कसे बदलते, त्याचा एका वेगळ्याच वाटेवरील प्रवास सुरु होतो. आता हा प्रवास त्याला कोणत्या वाटेवर आणून सोडतो, हे 'कानभट'मध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून सब्स्क्रिप्शन न भरता केवळ एक ठराविक रक्कम भरून हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " हा चित्रपट पाल्यांनी आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा, असा आहे. हा चित्रपट जुन्या काळातील शिक्षण पद्धती, रीती, परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात किती महत्वाच्या आहेत, याचे पैलू 'कानभट' मधून उलगडणार आहेत. खूप सुंदर आणि साधी अशी ही कथा असून आयुष्याला कलाटणी देणारा हा चित्रपट आहे.''

५० डिग्री तापमानात चित्रित झाला 'बलोच'

 


५० डिग्री तापमानात चित्रित झाला 'बलोच'


पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे अंगावर शहारा आणणारे ट्रेलर प्रदर्शित झाले. ट्रेलरवरून याचे चित्रीकरण किती आव्हानात्मक असेल, याचा आपण निश्चितच अंदाज बांधू शकतो. पडद्यावर हे वास्तव खरेखुरे भासावे, याकरता या चित्रपटात नैसर्गिकतेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.  मेकअप, पोशाख ते अगदी चित्रीकरण स्थळापर्यंत सगळ्याच गोष्टी नैसर्गिक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'बलोच'चे चित्रीकरण हे जैसलमेरच्या रखरखीत उन्हात ५० डिग्री तापमानात झाले आहे. दिवसा इथले तापमान ५० डिग्री असायचे तर रात्री हे तापमान सुमारे ९-१० डिग्रीपर्यंत जायचे.अशा संमिश्र तापमानात चित्रपटातील सर्व कलाकारांनी चित्रीकरण पूर्ण केले. भारत - पाकिस्तान बॉर्डरवर या चित्रपटाचे चित्रीकरण होत असताना कलाकारांना अनेक चांगल्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले. असे असले तरी पाकिस्तानी जवानांनी सीमेपार उभं राहून 'बलोच'च्या चित्रीकरणाचा आनंद लुटला. 


या अनुभवाबद्दल प्रविण तरडे म्हणतात, "महाराष्ट्रातील ४० डिग्री तापमानात आपली अवस्था खराब होते. तिथे ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले. या रखरखत्या उन्हात चित्रीकरण करणे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. आमची ४०-५० जणांची टीम होती. सीन चित्रित झाल्यावर आम्ही तंबूत जायचो, मात्र तिथेही उन्हाच्या झळा यायच्या. आम्हाला भीती होती की, चित्रीकरणादरम्यान काही शारीरिक अडचणी येऊ नयेत आणि सुदैवानं असं काहीही झालं नाही. सगळं सुरळीत पार पडलं. एक मात्र आवर्जून सांगावसं वाटतं, ते म्हणजे या रखरखत्या उन्हात मराठे कसे लढले असतील, याचा अंदाज आम्हाला इथे आला. खरंतर पानिपतचे युद्ध हा मराठ्यांचा पराभव नसून ही मराठ्यांची विजयगाथा आहे आणि हेच आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचीआहे.''


अमेय विनोद खोपकर, विश्वगुंज पिक्चर्स, कीर्ती वराडकर फिल्म्स आणि अमोल कागणे स्टुडिओज प्रस्तुत 'बलोच' या चित्रपटाचे दिग्दर्शक, कथा, पटकथाकार प्रकाश जनार्दन पवार आहेत. तर महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी. के.), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड निर्माते असून पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार हे सहनिर्माते आहेत. 'बलोच'मध्ये  प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, अमोल कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या वितरणाचे काम फिल्मास्त्र स्टुडिओजच्या अमेय खोपकर, अमोल कागणे आणि प्रणित वायकर यांनी पाहिले आहे.