Friday, 19 July 2024

डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार? 'लाईफलाईन' चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

 


डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार? 

'लाईफलाईन' चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित



 डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत नुकताच 'लाईफलाईन' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. 


 ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. 



क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत 'लाईफलाईन' चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर म्हणतात, " दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्याच चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज कलाकार असणे, ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्टी आहे. व्यक्तिरेखा ठरल्यावर ज्यावेळी कलाकारांची निवड करण्याची वेळी आली, तेव्हा माझ्या मनात ही दोन नावे आधी आली. त्यानुसार मी अशोक सराफ सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या समोर अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स होत्या. सरांनी मला विचारले, एवढे चित्रपट असताना मी या चित्रपटाला होकार का द्यावा? यावर मी माझी स्क्रिप्ट त्यांना वाचून दाखवली आणि त्यामागची माझी भावनाही पटवून दिली. सरांचा होकार माझ्यासाठी फार आनंदाची बाब होती. चित्रपटातील सगळे कलाकार उत्कृष्ट आहेत. प्रत्येक कलाकाराची इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख आहे. चित्रपटाबद्दल सांगायचे तर आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेमध्ये अडकलेला हा वाद आहे. आता या वादाचा शेवट कसा होतो, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 'लाईफलाईन'च्या निमित्ताने सामाजिक जागरूकता पसरवण्याचाही प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल.''


तर अशोक सराफ म्हणतात, ‘’ ज्यावेळी साहिलने मला चित्रपटाबद्दल सांगितले, त्यावेळी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न विचारला किरवंताची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे, त्यावेळी त्याने माधव अभ्यंकर यांचे नाव घेतले. तिथेच मला या मुलाची समज कळली. मला हा विषय आवडला. प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे. एक तरूण दिग्दर्शक असा चित्रपट बनवतोय, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.’’


‘बाबू नाय… बाबू शेठ’ ॲक्शनपट ‘बाबू’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात संपन्न


https://youtu.be/idmRIrHREA4?si=w_PiDY2aIkMep2jN

 ‘बाबू नाय… बाबू शेठ’ 

ॲक्शनपट ‘बाबू’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात संपन्न 


बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश 'बाबू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली. तर 'बाबू'नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना, भगिनींना घेऊन तो ही या कोळी नृत्यात सहभागी झाला. या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या २० फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते.  



प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील  प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, " मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’ 


श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Monday, 15 July 2024

Sanstar Limited’s Initial Public Offering to open on Friday, July 19, 2024, price band set at ₹90/- to ₹95/- per Equity Share



 Sanstar Limited’s Initial Public Offering to open on Friday, July 19, 2024, price band set at ₹90/- to ₹95/- per Equity Share

Mumbai, July 15, 2024: Sanstar Limited is one of the major manufacturers of plant-based speciality products and ingredient solutions in India for food, animal nutrition and other industrial applications (Source: Company Commissioned Frost & Sullivan Report, dated May 18, 2024), has fixed the price band of ₹90/- to ₹95/- per Equity Share of face value ₹2/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Friday, July 19, 2024, for subscription and close on Tuesday, July 23, 2024. Investors can bid for a minimum of 150 Equity Shares and in multiples of 150 Equity Shares thereafter.


The IPO consists of Fresh Issue of up to 41.80 million Equity Shares and an Offer for Sale (“OFS”) of up to 11.90 million Equity Shares by the Promoter Selling Shareholders and Promoter Group Selling Shareholders.


The proceeds from the fresh issue to the extent of Rs 181.55 crore will be utilized for funding the capital expenditure requirement for expansion of its Dhule Facility, Rs 100 crore for repayment and/or pre-payment, in part or full, of certain borrowings availed by the Company and general corporate purposes.


The Ahmedabad-based company offers a range of products such as liquid glucose, dried glucose solids, maltodextrin powder, dextrose monohydrate, native maize starches, modified maize starches, and co-products including germs, gluten, fiber, and enriched protein, among others. Their specialty products and ingredient solutions add taste, texture, nutrients and increased functionality to foods as ingredients, thickening agents, stabilizers, sweeteners, emulsifiers and additives (in bakery products, confectionery, pastas, soups, ketchups, sauces, creams, deserts, amongst others), animal nutrition products as nutritional ingredients, and other industrial products as disintegrants, excipients, supplements, coating agents, binders, smoothing & flattering agents, finishing agents, among others. 


Sanstar operates two manufacturing facilities covering a total area of 10.68 million square feet (approximately 245 acres) situated in Dhule, Maharashtra, and Kutch, Gujarat. It has an installed capacity of 3,63,000 tons per annum (1,100 tons per day) as of May 18, 2024, according a Company Commissioned Frost & Sullivan report and ranks amongst the leading top 5 manufacturers of maize-based specialty products and ingredient solutions in India. 


The Company exports its products to 49 countries across Asia, Africa, the Middle East, the Americas, Europe, and Oceania and has established its presence across India, distributing its products to 22 states.

Sanstar’s revenue from operations has increased at a CAGR of 45.46% from ₹ 504.40 crore in Fiscal 2022 to ₹ 1,067.27 crore in Fiscal 2024 while their profit after tax has grown at a CAGR of 104.79% from ₹ 15.92 crore in Fiscal 2022 to ₹ 66.77 crore in Fiscal 2024, on the basis of its restated consolidated financial statements.


Pantomath Capital Advisors Private Limited is the sole book running lead manager and Link Intime India Private Limited is the registrar to the Offer. The Equity Shares are proposed to be listed on BSE and NSE.


Notes for Reference: 

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

Fresh (41,800,000 equity shares)  OFS  (11,900,000 equity shares) Total 

Lower Band (@Rs 90) Rs 376.20 crore Rs 107.10 crore Rs 483.30 crore

Upper Band (@Rs 95) Rs 397.10 crore Rs 113.05 crore Rs 510.15 crore

Tuesday, 9 July 2024

कवींनी घातली मेघांना साद आणि बरसल्या "पाऊसधारा" "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन



 कवींनी घातली मेघांना साद आणि बरसल्या "पाऊसधारा" 


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पाऊस!किती आनंद देणारा. तसा पावसाळा सर्वांचा आवडता ॠतू. पावसाळ्यात मेघांतून पडण्यार्‍या जलधारांतून निर्माण होतात निर्सग निर्मित विलोभनीय दृश्यं. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ, वार्‍यात गारवा मिसळलेला. ऊन्हाने त्रस्त झालेल्या धरणीपासून ते प्राणीमात्रांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटणारा पाऊस!


बालपणी शाळेला सुट्टी मिळावी म्हणून पावसाला घातलेली भोलानाथाची साद, शेतकरी पेरणी करून, धरणीची ओटी बिजाने भरून घेतो तेव्हा बर्‍याच दिवसांसाठी वाट बघायला लावणारा तो पाऊस!. आणि कधी अचानक हवामान खात्याचे सगळेच अंदाज चुकवून शेतकर्‍यांच्या गाई-वासरांच्या "मेघमल्हाराला" ऐकून धावत येऊन जोरात पडणारा पाऊस! कित्येक वर्षापासून कोरड्या असणार्‍या नद्यांना आपल्या खळखळत्या पाण्याने भिजवणारा पाऊस!


माणसांना नवी उभारी देणारा, माणसाच्या हाताला काम देणारा, भूतकाळातल्या गमती-जमतींना उजाळा देणारा रिमझिम बरसणारा हळवा पाऊस. काळ्या भेगा पडलेल्या धरणीसाठी धो-धो कोसळणारा प्रियकर, उनाड, अवखळ पाऊस! किती किती रूपं आहेत ना ह्या पावसाची!!


पण जेव्हा हा असा सर्वांचा आवडता पाऊस दडीमारून बसतो तेव्हा शेतकर्‍यांपासून ते नोकरदारांपर्यंत सर्वांच्या तोंडचे पाणी पळालेले असते. तेव्हा पावसाला प्रत्येकजण साद घालतात, काहीजण तर अगदी देवाला नवस करतात आणि व्याकूळ होतात पावसाच्या दर्शनासाठी. त्यांची अवस्था होते अगदी भेगा पडलेल्या धरणीसारखी. तेव्हा त्या रूसलेल्या पावसाचा रागरुसवा घालण्यासाठी तानसेना सारखी साद घालताना मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात आपल्या कवितांच्या मेघमल्हारातून पावसाला साद घालून मुंबई अखेर ओलेचिंब केली.


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने "पाऊसधारा" पाचवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी अष्टपैलू साहित्यिका कल्पना दिलीप मापूसकर ह्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांचे वैभवी विनीत गावडे यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले. त्यावेळी शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर हेदेखील उपस्थित होते. कविसंमेलनाची सुरूवात सरोज सुरेश गाजरे यांच्या मातापित्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. 

कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये वैभवी विनीत गावडे, सुहास नारायण जोशी, सुनिता पांडुरंग अनभुले, प्रसाद यशवंत कोचरेकर, अनील खेडेकर, रामकृष्ण चिंतामण कामत, मीरा सावंत, गौरी यशवंत पंडित, बालकवी वेदान्त यशवंत पंडित, अपर्णा अनिल पुराणिक, प्रणाली प्रकाश सावंत, डॉ. मानसी पाटील, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, नंदा कोकाटे, आदित्य प्रदीप भडवळकर, अनु इंगळे, स्मिता शाम तोरसकर, सानिका ज्योतीकुमार कुपटे आणि सनी आडेकर

यांनी आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. मध्यंतरामध्ये वेदान्त पंडित याने त्याचं बक्षिसपात्र वक्तृत्व स्पर्धेतील भाषण, सुहास जोशी सुंदर असं नाट्यपद तर शितलादेवी कुळकर्णी यांनी एक विनोदी कविता सादर करून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. चहा अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेच कवी पुन्हा कविता सादरीकरणासाठी सज्ज झाले. 


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सर्व कवींनी आपल्या आवडत्या कवींच्या पाऊस कविता सादर केल्या. त्यात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज, बालकवी, ग्रेस, मंगेश पाडगांवकर, पुल देशपांडे, बा. भ. बोरकर, शंकर वैद्य, अशोक परांजपे, नलेश पाटील, संदीप खरे, बहिणाबाई, शांता शेळके यांच्या कवितांसोबत संजय कांबळे, गौरी पंडित, सरोज गाजरे आणि शेलेश निवाते यांच्या कवितांनी आभाळालाही भरून आलं आणि पाऊसधारा बरसू लागल्या.

 

संमेलनाध्यक्ष कल्पना मापूसकर यांनी मनोगतामध्ये मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाची सांगता करताना 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 


ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी पुढचे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी गुणी साहित्यिका गौरी यशवंत पंडित असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले.


कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी वैभवी गावडे, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.



Monday, 8 July 2024

RAYS Power Infra Announces Creation of 100% Owned Subsidiary for Gigawatt-Scale Solar and BESS Manufacturing

 

RAYS Power Infra Announces Creation of 100% Owned Subsidiary for Gigawatt-Scale Solar and BESS Manufacturing

 

July 08, 2024 — RAYS Power Infra, a leading name in the renewable energy sector, is proud to announce the establishment of a wholly-owned subsidiary dedicated to the manufacturing of solar modules, solar cells, and Battery Energy Storage Systems (BESS) at a gigawatt scale. This strategic move marks a significant step forward in the company's commitment to advancing clean energy solutions.

 

The new subsidiary will focus on setting up large-scale manufacturing facilities, and the company is currently evaluating land options and incentive policies across various states. Details of the plans and the quantum of investment will be disclosed soon, highlighting RAYS Power Infra's commitment to substantial and impactful investment in this venture.

 

Speaking on this momentous occasion, Mr. Ketan Mehta, Managing Director of RAYS Power Infra, stated, "This initiative represents a crucial backward integration step for RAYS Power Infra. Our existing EPC and development businesses will provide robust support to our solar module and cell manufacturing efforts. We have identified a significant quality gap in the current market offerings, and it is imperative to bridge this gap with superior products. Hence, we are embarking on this ambitious journey."

 

In addition, RAYS Power Infra is exploring partnerships with global technology leaders to enhance its product offerings. "We are actively finalizing technology-sharing agreements with renowned global technology leaders. This will enable us to leapfrog in creating products that meet and exceed global standards. This partnership is set to be mutually beneficial, providing our partners with a ready market through RAYS Power Infra's extensive network," Mr. Sanjay Gupta, Executive Director Rays power infra 

 

RAYS Power Infra is committed to making significant strides in the renewable energy sector, ensuring the delivery of high-quality, reliable, and innovative energy solutions.

 

Wednesday, 3 July 2024

Mumbai-based Gala Precision Engineering gets Sebi nod for IPO

 

Mumbai-based Gala Precision Engineering gets Sebi nod for IPO

 

Mumbai-based Gala Precision Engineering Limited, a leading precision component manufacturer of technical springs, has received final observation from the capital markets regulator, Securities and Exchange Board of India (SEBI), to raise funds through an initial public offering (IPO).

 

The Company had filed its IPO papers with Sebi on February 14, 2024.

 

The IPO has a face value of Rs 10 and consists of a fresh issue of equity shares up to 25.58 lakh and an offer for sale up to 6.16 lakh equity shares by the Promoter Group and Individual Selling Shareholders. The offer includes a reservation for subscription by eligible employees.

 

The Offer is being made through the book-building process, wherein not more than 50% of the offer shall be available for allocation on a proportionate basis to qualified institutional buyers, not less than 15% of the offer shall be available for allocation to non-institutional bidders, and not less than 35% of the offer shall be available for allocation to retail individual bidders.

 

The proceeds from the fresh issue, to the extent of Rs 37 crore for setting up a new facility at Vallam-Vadagal, SIPCOT, Sriperumbuddur, Tamil Nadu for manufacturing high tensile fasteners and hex bolts; Rs 11.07 crore for funding capital expenditure requirements towards the purchase of equipment, plant and machinery at Wada, Palghar, Maharashtra; Rs 30 crore for repayment/ prepayment, in full or part, of certain borrowings availed by the Company; and General Corporate Purposes.

 

Led by Kirit Vishanji Gala, Gala Precision is a technology-driven company with a strong focus on quality, design tool development, and application engineering. It has more than 3 decades of experience in developing customized products to meet the evolving needs of its customers and commands an approximation of 15% market share in the domestic SFS market for wind turbines.

 

Gala Precision’s business primarily comprises of springs technology division, which manufactures DSS including wedge lock washers (“WLW”), coil & spiral springs (“CSS") and special fastening solution (“SFS”) which manufactures anchor bolts, studs, and nuts.

 

The Company operates its business from its two manufacturing facilities located in Wada, Palghar, Maharashtra. Further, it is also setting up a new manufacturing facility in Vallam-Vadagal, SIPCOT, Sriperumbuddur, Tamil Nadu for developing various high-tensile fasteners to add to its existing product portfolio and new products.

 

PL Capital Markets Private Limited is the sole book-running lead manager for the IPO, and Link Intime India Private Limited is the registrar of the offer. The equity shares are proposed to be listed on the BSE and NSE.

 

Gurugram-based renewable energy company ACME Solar Holdings Limited files DRHP for Rs 3,000 crore IPO

 Gurugram-based renewable energy company ACME Solar Holdings Limited files DRHP for Rs 3,000 crore IPO

ACME Solar Holdings Limited is one of the largest renewable energy independent power producers (“IPP”) in India and among the top 10 renewable energy players in India in terms of operational capacity (Source : CRISIL Report)
 
Gurugram-based Acme Solar Holdings Limited, with a portfolio of solar, wind, hybrid and firm and dispatchable renewable energy (“FDRE”) projects, has filed its draft red herring prospectus (DRHP) with the market regulator, Securities and Exchange Board of India (SEBI), to raise Rs 3,000 crore through an initial public offering (IPO).
 
The IPO, with a face value of Rs 2 per equity share, is a mix of fresh issue of shares up to Rs 2,000 crore and an offer for sale (OFS) of up to Rs 1,000 crore by ACME Cleantech Solutions Private Limited. The offer also includes a reservation for a subscription by eligible employees and a discount is being offered to eligible employees bidding in the employee reservation portion.
The company, in consultation with the book-running lead manager, may consider an issue of specified securities up to Rs 400 crore as a "pre-IPO placement". If such placement is completed, the fresh issue size will be reduced. 
The offer is being made through the book-building process, wherein not less than 75% of the net offer shall be available for allocation on a proportionate basis to qualified institutional buyers, not more than 15% of the net offer shall be available for allocation to non-institutional investors, and not more than 10% of the net offer shall be available for allocation to retail individual investors.
 
The company intend to utilize the Net Proceeds from the fresh issuance to the extent of Rs. 1,500 crores towards repayment/prepayment, in full or in part, of certain outstanding borrowings availed by the Subsidiaries and for general corporate purposes.
 
ACME Solar Holdings Limited is one of India's largest renewable energy independent power producers (IPPs) and ranks among the top 10 renewable energy players in the country in terms of operational capacity as of March 31, 2024, according to a CRISIL Report. Over the years, ACME Solar has diversified and expanded its portfolio from solar power projects to becoming an integrated renewable energy company in India.
 
The company develops, builds, owns, operates, and maintains utility-scale renewable energy projects through its in-house engineering, procurement, and construction (EPC) division, as well as its operation and maintenance (O&M) team. ACME Solar generates revenue by selling electricity to various off-takers, including central and state government-backed entities. 
 
As of March 31, 2024, 18 out of our 28 Operational Projects are located in the states of Andhra Pradesh Rajasthan, and Telangana representing 85.07% of its total Operational Projects capacity.
 
Acme Solar’s restated consolidated revenue from operations during the fiscal year 2024 increased 1.88% to Rs 1,319.25 crore from Rs 1,294.90 crore in the previous year. The Company had turnaround from being loss making in FY23 to a profit of Rs 698.23 crore in FY24.
 
Established in 2015, ACME Solar was formed to consolidate the ACME Group’s renewable energy business and capitalize on opportunities in the Indian renewable energy industry. The promoter company, ACME Cleantech, was incorporated in 2003 and is led by Manoj Kumar Upadhyay. Initially providing energy management solutions to wireless telecommunications operators in India, ACME Cleantech entered the renewable energy generation business in 2009.
 
ACME Group was one of the early entrants in the solar IPP business in India, commissioning its first solar power plant in Fiscal 2012. Since then, the group has developed, executed, and commissioned a total of 2,719 MW (3,668 MWp) of solar power projects.
 
As of March 31, 2024, ACME Solar had an aggregate operational project capacity of 1,320 MW (1,802 MWp) of solar power projects. It also had under construction contracted project capacity of 1,650 MW, including 1,500 MW (2,192 MWp) of solar power projects and 150 MW of wind power projects. Additionally, it had an under construction awarded project capacity of 2,380 MW, comprising 300 MW of solar power projects, 830 MW of hybrid power projects, and 1,250 MW of FDRE power projects. In May 2024, ACME Solar signed power purchase agreements for two of its under construction awarded FDRE projects with a combined capacity of 570 MW, bringing its under construction contracted project capacity to 2,220 MW.
 
Strategically, ACME Solar has also divested certain solar power projects to investors, delivering value to shareholders with a cumulative capacity of 1,379 MW (1,842 MWp) and used the proceeds to grow its business.
 
ACME Cleantech signed a memorandum of understanding with the Government of Uttar Pradesh for the development of a 600 MW closed-loop pump storage project in the state by ACME Urja Two Private Limited, the relevant project SPV. In June 2024, the company acquired the entire equity share capital of ACME Urja Two Private Limited.
 
Based in Gurugram, ACME Solar has an integrated in-house business platform to execute and operate its projects throughout their lifecycle—from bid submission to achieving commercial operations and ongoing operations and maintenance. Key activities performed by the team include tendering and bidding, land acquisition and approvals, financial closure, design engineering, procurement, construction, and O&M.
 
Nuvama Wealth Management Limited, ICICI Securities Limited, JM Financial Limited, Kotak Mahindra Capital Company Limited, and Motilal Oswal Investment Advisors Limited are the book-running lead managers, and KFin Technologies Limited is the registrar of the issue.
 

Saturday, 29 June 2024

*अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने दुसऱ्यांदा जिंकला टी२० विश्वचषक*


*अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारताने दुसऱ्यांदा जिंकला टी२० विश्वचषक*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आज टी२० विश्वचषक २०२४ चा विजेतेपद सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. भारताने अजिंक्य राहताना विजेतेपद पटकावले आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ १६९ धावा करू शकला.


विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले की हा त्याचा शेवटचा टी२० विश्वचषक होता, आम्हांला हेच साध्य करायचे होते. भारताकडून हा माझा शेवटचा टी२० सामना होता. आम्हांला तो कप उचलायचा होता. पुढच्या पिढीसाठी टी२० खेळ पुढे नेण्याची वेळ आली आहे. आयसीसी स्पर्धा जिंकण्याची आमची प्रतीक्षा आज पूर्ण झाली आहे. तुम्ही रोहितसारख्या खेळाडूकडे पहा, तो ९ टी२० विश्वचषक खेळला आहे आणि हा माझा सहावा विश्वचषक आहे. तो त्यास पात्र आहे.


भारताने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला आहे. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी२० विश्वचषक जिंकला आहे. १३ वर्षांनंतर विश्वचषक जिंकू शकले आहेत. २०११ मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.


भारताने २००७ मध्ये पहिला टी२० विश्वचषक जिंकला आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेतील २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी हे त्यांचे शेवटचे आयसीसी विजेतेपद होते. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. मात्र, या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने कोणतीही चूक केली नाही. मात्र, अंतिम फेरीत भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत एक वेळ अशी आली की सामना भारताच्या हातातून जाणार असे वाटत होते.


प्रथम फलंदाजी करताना भारताने ३४ धावांत ३ विकेट गमावल्या. मात्र, त्यानंतर विराट कोहलीने (७६) अक्षर पटेल (४७) आणि शिवम दुबे यांच्या साथीने शानदार फलंदाजी केली. विराटने अक्षरसोबत ७२ आणि शिवमसोबत ५७ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात मदत केली. गोलंदाजीच्या वेळीही असेच घडले, जेव्हा हेनरिक क्लासेनने आपल्या झंझावाती फलंदाजीने सामना जवळपास दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नेला. त्यानंतर हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.


दक्षिण आफ्रिकेने १४ षटकांत ४ विकेट गमावून १२३ धावा केल्या होत्या. १५व्या षटकात कर्णधार रोहितने अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला. या षटकात क्लासेनने चौकाराने सुरुवात केली आणि दोन चौकार आणि दोन षटकारांसह एकूण २४ धावा केल्या. १५ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ४ गड्यांच्या मोबदल्यात १४७ धावा होती. यावेळी प्रत्येक चाहता कर्णधार रोहितला अक्षरला गोलंदाजी करू दिल्याबद्दल शिव्या देत होता. त्यावेळी क्लासेन २२ चेंडूत ४९ आणि डेव्हिड मिलर १४ धावांसह खेळपट्टीवर होते. १६ षटकांत दक्षिण आफ्रिकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या होत्या. पण भारताने १७व्या षटकात सामन्याचे चित्र फिरवले. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या २४ चेंडूत २६ धावांची गरज होती. यानंतर १७व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ ४ धावा दिल्या. १८व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत २ धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात ४ धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. शेवटच्या चेंडूवर एक धाव आली आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला.


टी२० विश्वचषक २०२४ च्या विजयासह राहुल द्रविडचा भारतीय संघातील मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला. द्रविड जेव्हा प्रशिक्षक बनला तेव्हा आधुनिक क्रिकेटमध्ये तो कसा प्रशिक्षक होईल किंवा कसोटी खेळाडूला टी२० क्रिकेटमध्ये प्रशिक्षक बनणे योग्य आहे की नाही याबद्दल बरीच चर्चा झाली होती, परंतु आधुनिक क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याच्या प्रचंड दबावातही द्रविडने आपले वर्चस्व कायम राखले. सन्मानाने त्याचे स्थान आणि सभ्यतेपासून यशापर्यंतच्या प्रवासाचे उदाहरण दिले. हा तोच द्रविड आहे जो वेस्ट इंडिजच्या भूमीवर २००७ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर रडला होता, पण आता जेव्हा त्याने टीम इंडियाला निरोप दिला तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गुरु द्रविडने वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताला जगज्जेता बनवले.


मात्र, ११ वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद पटकावल्यानंतर 'द वॉल' देखील भावूक होताना दिसला. फायनलचा 'प्लेअर ऑफ द मॅच' विराट कोहलीने त्याला विश्वचषक ट्रॉफी बहाल करताच, त्याने आपल्या सर्व आंतरिक भावना व्यक्त केल्या. द्रविडला असे करताना पाहून कोणीही कल्पना करू शकत नाही. त्याने कधीही सनसनाटी मथळे केले नाहीत, परंतु गॅरी कर्स्टनप्रमाणे संघ आणि खेळाडूंसोबत शांतपणे काम केले.


प्रशिक्षक म्हणून आव्हाने सोपी नव्हती, कारण त्याच्याकडे असा संघ होता ज्यात जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक चाहते आहेत आणि ज्यात नामांकित स्टार आहेत. त्यांना सांभाळणे इतके सोपे नव्हते. २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेनंतरच त्याच्या आव्हानांना सुरुवात झाली. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांना अधिकृतपणे भारताचे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. त्याच्यापूर्वी रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे संघाला पुढे नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रशिक्षक म्हणून तो ऑस्ट्रेलियाचा दौरा करू शकला नाही, पण त्याच्या संघाने वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. मात्र, कसोटी मालिकेत दुबळ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध एक पराभव आणि एक सामना अनिर्णित राहिला. ही सल मात्र कायम राहील.


मैदानावरील आव्हानांव्यतिरिक्त, सुपरस्टार्सने भरलेली भारतीय ड्रेसिंग रूम हाताळणे कमी आव्हानात्मक नव्हते. त्याला माहीत होते की एखादी छोटी गोष्टही मोठी गोष्ट व्हायला वेळ लागणार नाही. पण द्रविडकडे परिस्थिती आणि लोक हाताळण्याची उत्तम क्षमता आहे, ज्याचा त्याने प्रशिक्षक म्हणून पुरेपूर वापर केला. प्रत्येक खेळाडूची भरभराट होईल असे वातावरण त्यांनी निर्माण केले. आता तो संघ सोडताना त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते, टीम इंडियाला चॅम्पियन बनवल्याचे समाधान. द्रविड इतका भावूक झाला की त्याने प्रत्येक खेळाडूला बराच वेळ मिठी मारली. हार्दिक पांड्यापासून विराट कोहली आणि रोहित शर्मापर्यंत सगळ्यांना त्याने मिठी मारली आणि रडवले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.


द्रविडचा करार नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला होता, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला टी२० विश्वचषकापर्यंत संघासोबत राहण्याची खात्री दिली होती. आता जय शाह आणि बीसीसीआयचा हा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाने आपल्या माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षकाचा आदरपूर्वक निरोप घेतला.

Saturday, 22 June 2024

बांगलादेशवर विजयासह भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, हार्दिक-कुलदीपची दमदार कामगिरी



 बांगलादेशवर विजयासह भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर, हार्दिक-कुलदीपची दमदार कामगिरी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवारी बांगलादेशविरुद्ध ५० धावांनी दणदणीत विजय नोंदवल्यानंतर भारताने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा आणखी बळकट केल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाने सुपर- मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध ४७ धावांनी विजय मिळवून विजयी मोहीम तिव्र केली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशविरुद्ध २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या.


सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने गट-१ च्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. दोन सामन्यांत सलग दोन विजयांसह त्यांच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत. याशिवाय त्यांची निव्वळ धावगती +२.४२५ झाला आहे. त्याचवेळी त्यांना त्यांचा पुढील सामना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सध्या त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत.  पहिले स्थान मिळविण्यासाठी त्यांना रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळवण्यात येणारा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 


१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला लिटन दास आणि तनजीद हसन यांच्यामुळे चांगली सुरुवात झाली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाली. लिटन १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला. त्याचवेळी ६६ धावांवर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तनजीदने पायचीत बाद केले. तो २९ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात कर्णधार नजमुल हसन शांतोशिवाय बांगलादेशकडून एकही फलंदाज खेळला नाही. त्याने ३२ चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. मात्र, अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना बुमराहने त्याला आपला बळी बनवले. भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची फलंदाजीची क्रमवारी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या सामन्यात तौहीदने चार, शाकिब अल हसनने ११ धावा, महमुदुल्लाहने १३ धावा, झाकीर अलीने एक धाव, रिशाद हुसेनने २४ धावा केल्या. तर मेहदी हसन आणि तनजीम अनुक्रमे पाच आणि एक धावा करून नाबाद राहिले. भारताकडून कुलदीप यादवने तीन तर अर्शदीप आणि बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.  त्याचवेळी हार्दिक पांड्यानेही एक विकेट घेतली.


बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि भारतीय संघाला २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावा करण्यात यश आले. या विश्वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या केली. नॉर्थ साऊंड स्टेडियमवर टी२० मधील ही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र कर्णधार रोहित शर्माला ही भागीदारी आणखी मोठी करता आली नाही आणि तो शाकिब अल हसनच्या चेंडूवर बाद झाला. रोहितच्या विकेटसह शाकिब टी२० विश्वचषकामध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची बॅटही या सामन्यात बोलली आणि त्याने २४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली. हार्दिक नंतर कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याचवेळी शिवम दुबेने हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली आणि २४ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. भारतीय संघ २०० धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, मात्र बांगलादेशचे गोलंदाज काही प्रमाणात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरले.


हार्दिक पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उद्या सकाळी ६ वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान तर रात्री ८ वाजता अमेरिका विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे.


अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २१ धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

 


अफगाणिस्तानने केला मोठा उलटफेर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच २१ धावांनी केला ऑस्ट्रेलियाचा पराभव


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषक २०२४ च्या ४८ व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सामना अफगाणिस्तानशी झाला. सुपर-८ चा हा महत्त्वाचा सामना होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने १४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १२७ धावांवर गारद झाला.


ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या टी२० विश्वचषक २०२४ च्या ४८ व्या सामन्यात पॅट कमिन्सने इतिहास रचला. त्याने सलग दुसऱ्या टी२०मध्ये विकेट्सची हॅट्ट्रिक घेतली. अफगाणिस्तानपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात कमिन्सने ही कामगिरी केली होती. यासह कमिन्सने इतिहास रचला आहे.  टी२० विश्वचषकात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. इतकंच नाही तर लसिथ मलिंगाला त्याच्या संपूर्ण टी२० कारकिर्दीत तो रेकॉर्ड करता आला नाही.


अफगाणिस्तानच्या डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कमिन्सने राशिद खानला बाद केले होते. यानंतर २० व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर करीम जनात आणि गुलबदिन नायब यांना बाद झाले. तत्पूर्वी, बांगलादेशविरुद्ध कमिन्सने डावाच्या १८व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांना बाद केले होते. त्याने महमुदुल्लाला (२) त्रिफळाचीत बास केले आणि मेहदीला (०) झंपाकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कमिन्सने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तौहीद हृदयॉय (४०) याला बाद करून विशेष कामगिरी केली.


कमिन्स आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा केवळ पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साऊथी, सर्बियाचा मार्क पावलोविक आणि माल्टाचा वसीम अब्बास यांनी ही कामगिरी केली होती. कमिन्स हा पाचवा गोलंदाज आहे. तथापि, सलग दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारा कमिन्स हा जगातील पहिला गोलंदाज आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ही आठवी हॅट्ट्रिक ठरली. कमिन्सने यापैकी दोनदा ही कामगिरी केली आहे. सात गोलंदाजांनी आठ हॅटट्रिक घेतल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकात हॅटट्रिक घेतली आहे. कमिन्सशिवाय ब्रेट लीने २००७ मध्ये ही कामगिरी केली होती. कमिन्स हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज आहे.


नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. एकवेळ अफगाणिस्तान संघाने एकही विकेट न गमावता ११८ धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर ३० धावा करताना संघाने सहा विकेट गमावल्या. अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 95 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. स्टॉइनिसने गुरबाजला बाद करून ही भागीदारी भेदली. तो ४९ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६० धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर झाम्पाने १७व्या षटकात अजमतुल्ला ओमरझाई आणि इब्राहिम झद्रान यांना बाद केले. झाद्रानने ४ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. ओमरझाईने दोन धावा केल्या. करीम जनात १३ तर कर्णधार राशिद खानला दोन धावा करता आल्या. मोहम्मद नबी १० धावा करून नाबाद राहिला.

अफगाणिस्तान संघाने इतिहास रचला आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखालील या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये तो विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण मॅक्सवेलने त्याच्याकडून विजय हिसकावून घेतला. मात्र, यावेळी अफगाणिस्तानने अशी कोणतीही चूक केली नाही आणि किंग्सटाउन येथे ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि दोन टी२० सामने खेळले गेले आहेत. एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचा संघ कधीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकू शकला नाही, मात्र टी२० च्या दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम जद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत १२७ धावांवर गारद झाला.  गुलबदिन नायबने ४ विकेट घेतल्या. 


या सामन्यात एकेकाळी ऑस्ट्रेलियाने ३२ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉइनिससोबत ३९ धावांची भागीदारी केली. नायबने स्टॉइनिसला बाद करून ही भागीदारी भेदली. इथून सामन्याला कलाटणी मिळाली. जेव्हा मॅक्सवेलने त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११ वे अर्धशतक झळकावले, तेव्हा त्याने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवण करून दिली, जेव्हा मॅक्सवेलने अफगाणिस्तानवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी अविश्वसनीय खेळी खेळली. असेच पुन्हा होईल असे वाटत होते, पण गुलबदिनने मॅक्सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित केल्या. 


मॅक्सवेल व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला १५ चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही. ट्रॅव्हिस हेड (०), डेव्हिड वॉर्नर (३), कर्णधार मिचेल मार्श (१२), मार्कस स्टॉइनिस (११), टीम डेव्हिड (२), मॅथ्यू वेड (५), पॅट कमिन्स (३), ॲश्टन अगर (२) आणि ॲडम झाम्पा (९) विशेष काही करू शकला नाही. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे सुपर-८ गट-१ मधील उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रोमांचक झाली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला आपला शेवटचा सुपर-८ सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. दोघेही हरले तर निव्वळ धावगतीच्या आधारावर खेळ रंगेल.


गुलबदिन नायबला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.



महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे १०वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न

 


महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे  १०वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संपूर्ण देशात योगसाधने बाबत जनजागृती सोबतच समाजाला सदृढ ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील योग शिक्षक हा अहोरात्र झटत आहे, म्हणूनच सलाबाद प्रमाणे महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवारांच्या आदेशवरून शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

     

याप्रसंगी घाटकोपर असल्फा येथील हिमालया सोसायटी परिसरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात योगशिक्षिका साक्षी कलगुटकर यांनी योगशिबिर घेतले. उपक्रमात असल्फा घाटकोपर येथील स्थानिक नगरसेवक किरणभाऊ लांडगे तसेच अनिता किरण लांडगे, महिला शाखाप्रमुख राजश्री चव्हाण आणि प्रमुख अतिथी डॉ. कल्पना जैस्वाल यांच्या हस्ते श्री ऋषीमुनी पतंजली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आली. मुंबई जिल्हा अध्यक्ष योगशिक्षक संतोष खरटमोल, उपाध्यक्षा साक्षी कलगुटकर, मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, सदस्या लक्ष्मी शर्मा, रेश्मा धुरी पाटील, ईश्वरी शिंदे, संपदा लातूरे यांनी उपस्थित साधकांकडून सूक्ष्म व्यायाम, योगआसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार प्रकार करून घेतले. 


तसेच मुंबई जिल्ह्याच्या कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर आणि सचिव अमित चिबडे यांनी अमित रिद्धी योगशाला मार्फत एवरशाईन नगर, मालाड पूर्व येथे, कार्यालय सचिव दिलीप घाडगे, सदस्य राजश्री मोरे यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिठागर रोड, महाराष्ट्र मंडळ मुलुंड येथे,  सदस्या रेखा भिंगार्डे, रश्मी सावर्डेकर, मनुजा चव्हाण, फाल्गुनी संघराजका, हिरा गणवीर, सविता कदम, संजीवनी शेटे ह्यांनी मुलुंड पुर्व आणि पश्चिम येथे, महासचिव कृष्णा शिंदे हे धारावी येथे, उपाध्यक्षा प्रियांका ढोले दादर येथे, महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे वरळी येथे, सचिव सुषमा माने मीरा रोड येथे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई आणि सोशल मीडिया प्रभारी निलेश मारुती साबळे हे बोरिवली येथे, सदस्या प्रियांका भोसले हे दहिसर येथे तर सदस्या अर्निका बांदेलकर ह्या घाटकोपर येथे, अशा सर्व योगशिक्षकांच्या मार्फत मुंबईभर योगदिवस साजरा करण्यात आला. वरील सर्व योगशिक्षकांडून संपूर्ण मुंबई मधून महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुंबई जिल्हा टीमकडून हा योगदिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून २०२४ आंतरराष्ट्रीय योगदिवसा निमित्त संपूर्ण मुंबईमधून विद्यार्थी तसेच त्यांचे पालकगण आणि योगसाधक आणि उपस्थित रहिवाश्यांना या उपक्रमात सामावून घेतल्याबद्दल सर्व योगवीर आणि योगवीरांगणांचे मुंबई जिल्हाअध्यक्ष संतोष महादेव खरटमोल यांनी मनापासून आभार व्यक्त केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


महिला कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की सोडत नाहीत - खा. शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न

 


महिला कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की सोडत नाहीत - खा. शरद पवार

यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी सन्मान पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न



पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो.‌ कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की, महिला ती संधी सोडत नाहीत, असे मत खासदार शरद पवार यांनी आज २२ जून २०२४ रोजी व्यक्त केले.



बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या हस्ते यशस्विनी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध उद्योजिका पद्मश्री आणि माजी खासदार अनू आगा यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदर वंदना चव्हाण, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह हेमंत टकले, जयदेव गायकवाड, यशवंतराव चव्हाण सेंटरचे पुणे जिल्हा केंद्र अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, रोहिणी खडसे, मृणालिनी वाणी, भारती शेवाळे, चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले, विविध लोकप्रतिनिधी, सहकारी, पत्रकार यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


लेखिका मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना यशस्विनी साहित्य सन्मान, कलावती सवंडकर (हिंगोली) यांना यशस्विनी कृषी सन्मान, संध्या नरे-पवार (मुंबई) यांना यशस्विनी पत्रकारिता सन्मान, रुक्मिणी नागापुरे (बीड) यांना यशस्विनी सामाजिक सन्मान, राजश्री गागरे (भोसरी-पुणे) यांना यशस्विनी उद्योजकता सन्मान आणि श्रद्धा नलमवार (नाशिक) यांना यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 


कार्यक्रमाचे औचित्य साधून संध्या नरे-पवार संपादीत व यशवंतराव चव्हाण सेंटर आणि सकाळ प्रकाशन निर्मित 'धोरण कुठवर आलं गं बाई' या पुस्तकाचे प्रकाशन खासदार शरद पवार, अनु आगा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात महिला धोरणाच्या तीन दशकीय प्रवासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. 


यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, 'हा केवळ सन्मान नसून महिलांच्या कष्टाचा आणि त्यागाचा गौरव आहे. समाज आणि घराला शिस्त लावणारी स्त्री कर्तबगार असते. आयुष्यात राजकीय निर्णय घेतला, तेव्हा मलाही पहिल्यांदा आईनेच प्रोत्साहन दिले होते. कॉलेजमध्ये होतो, तेव्हापासून गांधी, नेहरू यांचे विचार आवडायचे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेब यांची वैचारिक व सामाजिक भूमिका स्वीकारून राजकीय वाटचाल बळकट केली. महिला धोरण अंमलात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून त्यानंतर देशाने ते धोरण स्वीकारले, याचा आनंद आहे'.

वर्तमान काळात सगळी क्षेत्रे महिलांनी पादाक्रांत केली आहेत. त्यामुळे महिला दिन हा उत्सव एक दिवस साजरा करण्यापेक्षा महिलांना सन्मानाची वागणूक व परस्पर आदरभाव देवून वर्षभर महिला दिन साजरा करायला हवा. तेव्हाच महिला धोरणासारखे धोरणात्मक निर्णय यशस्वी होतील. सध्या महिला फारच नावलौकिक मिळवत आहेत. परंतु त्यांनी बचत गटासोबतच नवीन तंत्रज्ञान सुध्दा आत्मसात केले पाहिजे. वाढत्या सोशल माध्यमांच्या काळात डीपफेक, डार्कनेट हे प्रतिमा मलीन करणारे मार्ग ठरत आहेत. त्यामुळे महिलांनी सजग व जागरूक राहून काम करायले हवे, अशी अपेक्षा कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात व्यक्त केली.


याप्रसंगी बोलताना पद्मश्री अनु आगा म्हणाल्या की, 'प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्याचे सक्षम उदाहरण म्हणजे आजचे आपल्या पुरस्कारार्थी आहेत. म्हणून समाज, परिवार आणि नातेवाईक यांनी काहीतरी करू पाहाणाऱ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. आपला महाराष्ट्र महिला धोरणात कायम पुढे राहिला आहे. त्यामुळे  महिला कर्तृत्वाच्या इतिहासात महाराष्ट्र अनेक पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरेल'.


... तेव्हा सरकारमध्ये नव्हतो!

आमची आई फार शिस्तप्रिय होती. तीने आम्हा भावंडांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलो आणि यशस्वी झालो. परिणामी, आमच्या घरात आम्हा भावांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण सारखे मानाचे पुरस्कार मिळाले. पण, विशेष म्हणजे त्यावेळी मी सरकारमध्ये नव्हतो, अशी आठवण शरद पवार यांनी सांगताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.‌


....म्हणून रिल्समध्ये रिस्क असते.

आज प्रत्येक व्यक्ती सोशल मिडियाच्या आहारी गेला आहे. त्यातून स्टंटबाजी वाढली आहे. त्यामुळे रिल्स काढताना अनेकदा जीव धोक्यात घालणारे युवक युवती आपल्या अवतीभवती दिसतात. त्यांना वेळीच रोखायला  हवे.‌ तीस सेकंदाच्या रिल्सपेक्षा तुमचा जीव लाखमोलाचा आहे. हे लक्षात ठेवून स्वतःला मर्यादा घालून घ्या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. 


...अन्‌ मागे वळून पाहातो तर काय? सगळे सहकारी गायब!

कॉंग्रेस पक्षात असताना महिला धोरणाविषयी संसदेत बोलत होतो; तेव्हा समोरून चिठ्ठी आली. त्यात मागे वळून पाहा, असे म्हटले होतो. म्हणून मी मागे वळून पाहिले तर काय आश्चर्य. आमचे ७० टक्के सहकारी गायब झाले होते. म्हणजे महिला धोरण अंमलात आणताना केवळ राज्यात नव्हे तर, देशात सुध्दा विरोध झाला होता.‌ परंतु, सगळ्यांना सोबत घेवून ते धोरण यशस्वी करता आले, याचे मोठे समाधान आहे, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली. 


...स्टेजवरचे 'ते' दोघे कधीही न थांबणारे आहेत!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना खा. सुप्रिया सुळे यांनी महिला धोरण, इतिहास आणि यशाचा टप्पा अधोरेखित केला. इच्छा शक्तीची काही उदाहरणे देताना खासदार शरद पवार आणि पद्मश्री अनु आगा यांच्याकडे हात करून स्टेजवरचे 'ते' दोघे कधीच न थांबणारे आहेत! असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सुळे यांना प्रतिसाद दिला.